‘त्या’ १०२ पाझर तलावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी पाईपलाईन फोडली : अज्ञात व्यक्ती विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

Updated on -

Ahilyanagar News : पाथर्डी, नगर, नेवासा व राहुरी तालुक्यातील ४५ गावांमधील १०२ पाझर तलावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी वांबोरी चारीची मुख्य पाईपलाईन नगर तालुक्यातील पांगरमल शिवारात अज्ञात व्यक्तीने फोडल्याने वांबोरी चारीचा पाणीपुरवठा कमी दाबाने का होतोय याचा शोध मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी घेत असता पाईप लाईन पांगरमल शिवारात फोडल्याचे आढळून आले.

पाईपलाईन फोडणार्‍या अज्ञात व्यक्ती विरोधात मुळा पाटबंधारे विभागाने एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.मिरी शंकरवाडी तलावात पाणी पोहचले असता, पाणी पुरवठा बंद का झाला याचा शोध घेत असताना पांगरमल येथे अज्ञात व्यक्तीने मुख्य पाईपलाईन फोडल्याचे निदर्शनात आले. याबाबतची माहिती अशी की,सध्या उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेत.

ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसाठी पाण्याची मागणी करत आहेत त्यामुळे आ. कर्डिले यांच्या आदेशानंतर मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले. त्यानंतर मिरी शंकरवाडी परिसरातील पाझर तलावात हे पाणी पोहोचले परंतु गेल्या आठ दिवसापूर्वी नगर तालुक्यातील पांगरमल या ठिकाणी मुख्य पाईपलाईन फोडली त्यामुळे मोठ्या प्रमाणात पांगरमल शिवारात पाणी वाहून गेल्याने मिरी शंकरवाडीच्या तलावात सुरू असलेले पाणी बंद झाले.पाण्याचा विसर्ग बंद झाल्याने कर्मचारी तपास घेतला असता पांगरमल जवळ पाईप फोडण्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी शाखा अभियंता तुषार गर्जे यांना कळवले. शाखा अभियंता गर्जे यांच्यासह वांबोरी चारीची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी प्रत्यक्षपणे पाहणी केल्यानंतर मुख्य पाईपलाईन फोडण्याचे निदर्शनास आल्यानंतर. शाखा अभियंता तुषार गर्जे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पाईपलाईन फोडणार्‍याचा पोलिसांनी शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी पाथर्डी तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे, उपसरपंच संजय शिंदे,ज्येष्ठनेते साहेबराव गवळी, अण्णासाहेब शिंदे, महादेव पाटील कुटे, संजय नवल, शंकरवाडीचे सरपंच अशोक दहातोंडे,संभाजी दारकुंडे यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe