भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय ठरलेली Kia Carens आता महाग झाली आहे. Kia Motors ने अचानक या MPV ची किंमत वाढवली असून, ती खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. Kia Carens ही कमी बजेटमध्ये लक्झरी आणि पॉवरफुल 7-सीटर कार म्हणून ओळखली जाते. जर तुम्ही देखील ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर नवीन किमती आणि अन्य महत्त्वाच्या अपडेट्सबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे.
किंमतीत किती वाढ झाली ?
Kia Motors ने Kia Carens च्या किमतीत ₹10,000 पर्यंत वाढ केली आहे. या वाढीमुळे, भारतीय बाजारपेठेत Carens ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹10.60 लाखांपासून सुरू होते. याशिवाय, कंपनीने Kia Seltos आणि Kia Sonet या त्यांच्या इतर लोकप्रिय SUV मॉडेल्सच्या किमतीतही वाढ केली आहे. सर्वात जास्त किंमत वाढ Kia Carens Gravity व्हेरिएंटवर लागू झाली आहे, ज्याची किंमत आता आणखी ₹10,000 ने वाढली आहे.

इंजिन आणि पॉवरट्रेन पर्याय
Kia Carens मध्ये ग्राहकांना तीन प्रकारची इंजिन पर्याय मिळतात.1.5-लीटर NA पेट्रोल इंजिन – हे 115 Bhp पॉवर आणि 144 Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे. 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन – हे 160 Bhp पॉवर आणि 253 Nm टॉर्क निर्माण करते, जे स्पोर्टी आणि जलद परफॉर्मन्स प्रदान करते. 1.5-लीटर डिझेल इंजिन – हे 116 Bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क निर्माण करते. याला 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय दिले आहेत.
Kia Carens चे फीचर्स
Kia Carens मध्ये अनेक आधुनिक आणि लक्झरी फीचर्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे ती SUV पेक्षा कमी नाही
इन्फोटेनमेंट आणि कम्फर्ट फीचर्स
10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मागील प्रवाशांसाठी 10.1-इंचाची रिअर सीट इन्फोटेनमेंट स्क्रीन, 64 रंगांचे अॅम्बियंट लायटिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स , ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि एअर प्युरिफायर, वायरलेस मोबाइल चार्जिंग आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान, प्रीमियम लेदर सीट्स, दुसऱ्या रांगेत वन टच टम्बल सीट” फोल्डिंग ऑप्शन
सेफ्टी फीचर्स
सुरक्षेच्या बाबतीतही Kia Carens ही SUV पेक्षा कमी नाही. ही कार खालील सुरक्षा फीचर्ससह येते ज्यात 6-एअरबॅग्स (सर्व व्हेरिएंट्समध्ये स्टँडर्ड), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), हिल-होल्ड असिस्ट आणि डिस्क ब्रेक्स, डॅशकॅम कॅमेरा आदी फीचर्स समाविष्ट आहेत.
जर तुम्ही लक्झरी आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत असाल तर, Kia Carens हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र, नवीन किंमत वाढ तुमच्या बजेटवर परिणाम करू शकते, त्यामुळे डीलरशी संपर्क करून प्रत्यक्ष ऑफर्सबद्दल माहिती घ्या. किंमत वाढ असूनही, Kia Carens हे SUV आणि MPV चाहत्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. ही कार आधुनिक तंत्रज्ञान, लक्झरी फीचर्स आणि दमदार इंजिन पर्यायांसह येते. जर तुम्ही SUV प्रमाणेच आरामदायी आणि सुरक्षित 7-सीटर कार शोधत असाल, तर Kia Carens अजूनही एक आकर्षक निवड ठरू शकते.