Multibagger Stock : शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून येत असली, तरी काही कंपन्यांचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. खरे तर सध्या शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांकडून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. तसेच काही कंपन्या बोनस शेअरची आणि डिव्हीडेंड देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत.
यामुळे शेअर बाजारात काही स्टॉक फोकस मध्ये आले असून गॉडफ्रे फिलिप्स (Godfrey Phillips) या सिगरेट उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स सुद्धा गेल्या दोन दिवसांपासून फोकस मध्ये आहेत.

खरे तर या स्टॉकने गेल्या दोन दिवसात चांगली कामगिरी केली असून आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा दिला आहे. मागील दोन व्यापार सत्रांमध्ये या शेअर्सनी जवळपास 40% वाढ नोंदवली आहे.
कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर या कंपनीच्या स्टॉक मध्ये वाढ झाली आहे. दरम्यान आज आपण या कंपनीचे तिमाही निकाल कसे आहेत आणि सध्या शेअर बाजारात या कंपनीच्या स्टॉकची परिस्थिती कशी आहे याचा आढावा घेणार आहोत.
सध्या गॉडफ्रे फिलिप्सची कामगिरी कशी आहे?
आज, सोमवार 17 फेब्रुवारी 2025 रोजी बीएसईवर गॉडफ्रे फिलिप्सचे शेअर्स 5,880 रुपयांच्या स्तरावर उघडले. व्यापारादरम्यान या शेअरने उसळी घेत 7,170 रुपयांपर्यंत मजल मारली. यापूर्वी शुक्रवारी देखील कंपनीच्या शेअर्समध्ये 20% वाढ झाली होती.
कंपनीचे तिमाही निकाल कसे आहेत?
गॉडफ्रे फिलिप्सने आपल्या डिसेंबर तिमाहीच्या निकालांची घोषणा केली असून, त्यामध्ये कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कंपनीचा निव्वळ नफा हा 48.70% नी वाढला आहे.
डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 315.90 कोटी रुपये राहिला आहे, मागील वर्षी याच तिमाहीत 212.40 कोटी रुपये इतका होता. कंपनीचा एकूण महसूलमध्ये 27.30% ची वाढ झाली आहे.
या तिमाहीत कंपनीचा महसूल 1,591.20 कोटी रुपये राहिला, गेल्या वर्षाच्या याचं तिमाहीत महसूल 1,249.60 कोटी रुपये होता. EBITDA सुद्धा 57.60% वाढलाय, या तिमाहीत EBITDA 358.80 कोटी रुपये राहिला अन गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 227.70 कोटी रुपये इतका होता.
कंपनीच्या शेअर्सची गेल्या एका वर्षाची कामगिरी
गेल्या सहा महिन्यांमध्ये गॉडफ्रे फिलिप्सच्या शेअर्सनी 51% वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे, गेल्या एका वर्षात या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना तब्बल 169% चा नफा मिळाला आहे.
गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी
गॉडफ्रे फिलिप्सच्या शेअर्समधील ही मोठी तेजी पाहता गुंतवणूकदार आणि विश्लेषक या शेअर्सबाबत उत्साही आहेत. कंपनीच्या आर्थिक कामगिरीत झालेली सुधारणा आणि वाढलेली कमाई यामुळे शेअर बाजारात या स्टॉककडे मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.