HDFC FD News : जर तुम्ही सुरक्षित आणि निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करत असाल, तर फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे. बँकेची एफडी योजना ही सुरक्षित तर असतेच शिवाय अलीकडे बँकांनी एफडीवर चांगले व्याजदर देखील ऑफर केले आहे. एचडीएफसी ही खाजगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक देखील आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याज देत आहे.
खास करून, HDFC बँकेच्या 21 महिन्यांच्या एफडीवर मिळणारा व्याजदर आणि त्यावर मिळणारा परतावा गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरणार आहे. दरम्यान आज आपण एचडीएफसी बँकेचे 21 महिन्यांच्या एफडी योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

HDFC बँकेचा 21 महिन्यांचा एफडी व्याजदर
HDFC बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर आकर्षक व्याजदर ऑफर करत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 21 महिन्यांच्या कालावधीसाठी बँक 7.10% वार्षिक व्याजदर देते. (ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.60% असू शकतो.)
₹2.5 लाख गुंतवल्यास किती परतावा मिळेल?
जर एखाद्या सामान्य ग्राहकाने HDFC च्या 21 महिन्यांच्या एफडीमध्ये ₹2,50,000 ची गुंतवणूक केली, तर सदर ग्राहकाला एक वर्ष आणि नऊ महिन्यांनी म्हणजेच 21 महिने पूर्ण झाल्यानंतर दोन लाख 83 हजार 750 रुपये मिळणार आहेत.
7.10% वार्षिक व्याजदराने हा परतावा मिळणार असून यामध्ये गुंतवणूकदाराची मूळ रक्कम म्हणजेच अडीच लाख रुपये वजा करता 33 हजार 750 रुपये हे संबंधित ग्राहकाला व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना किती परतावा मिळणार ?
ज्येष्ठ नागरिक (60 वर्षांवरील गुंतवणूकदार) याच एफडीमध्ये पैसे गुंतवत असतील तर त्यांना 7.60% व्याजदर मिळेल. म्हणजे जर ज्येष्ठ नागरिकांनी या एफ डी योजनेमध्ये अडीच लाख रुपये गुंतवले तर त्यांना 21 महिन्यांनंतर त्यांना एकूण ₹2,86,500 मिळतील. म्हणजे ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ₹36,500 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.
एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे
सुरक्षित गुंतवणूक: बाजाराच्या चढ-उतारांचा कोणताही परिणाम होत नाही.
निश्चित परतावा: मुदत संपल्यानंतर खात्रीशीर परतावा मिळतो.
आवश्यकतेनुसार लिक्विडिटी: गरज पडल्यास एफडी तारण ठेवून कर्ज घेता येते.
एफडी उत्पन्नावर कर लागतो?
एफडीवरील व्याज टॅक्सेबल असते आणि वार्षिक व्याज ₹40,000 (ज्येष्ठ नागरिकांसाठी ₹50,000) पेक्षा जास्त असल्यास TDS लागू होतो. जर तुमचे एकूण उत्पन्न करपात्र नसेल, तर फॉर्म 15G/15H भरून TDS वाचवता येतो.
जर तुम्ही 21 महिन्यांसाठी सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळणारी गुंतवणूक करू इच्छित असाल, तर HDFC बँकेची एफडी चांगला पर्याय ठरू शकते. ₹2.5 लाख गुंतवल्यास साधारणतः ₹33,750 ते ₹36,500 इतका परतावा मिळू शकतो. तथापि, गुंतवणूक करण्यापूर्वी बँकेचे अपडेटेड व्याजदर आणि कर संलग्न अटी तपासून पाहाव्यात.