Share Market मधील गुंतवणूकदार बनलेत मालामाल, ‘हा’ 11.60 रुपयांचा स्टॉक 1280 रुपयांवर ! एका लाखाचे बनलेत 1.10 कोटी

शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या एका कंपनीच्या पेनिस स्टॉक नाही गेल्या पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे एक लाख रुपये 1.10 कोटी रुपये बनवलेत. खरेतर, भारतीय शेअर बाजारात लिस्टेड असणारे पेनी स्टॉक्स मोठ्या जोखमींसह मोठ्या संधीही घेऊन येतात.

Published on -

Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. मात्र या चढउताराच्या काळातही काही स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या एका कंपनीच्या पेनिस स्टॉक नाही गेल्या पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे एक लाख रुपये 1.10 कोटी रुपये बनवलेत.

खरेतर, भारतीय शेअर बाजारात लिस्टेड असणारे पेनी स्टॉक्स मोठ्या जोखमींसह मोठ्या संधीही घेऊन येतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे Nibe शेअर, ज्याने मागील पाच वर्षांत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.

दरम्यान आज आपण या स्टॉकची गेल्या पाच वर्षांमधील कामगिरी कशी राहिली आहे, 2025 मध्ये हा स्टॉक शेअर बाजारात कशी कामगिरी करतोय? याचाच आपण आढावा घेणार आहोत.

5 वर्षांत झाली 10,934% वाढ

फेब्रुवारी 2020 मध्ये अवघ्या ₹11.60 वर असलेला निबे शेअर आज ₹1,280 वर पोहोचला आहे. यामुळे या शेअरमध्ये गुंतवलेली ₹1 लाखाची रक्कम तब्बल ₹1.10 कोटींवर पोहोचली आहे. एवढ्या कमी कालावधीत एवढा मोठा परतावा देणारे स्टॉक्स दुर्मिळ असतात, त्यामुळेच निबे शेअरकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष वेधले गेले आहे.

सध्या स्टॉकची स्थिती कशी आहे?

मागील एका वर्षात निबे शेअर फक्त 9% ने वाढलाय. अन दुसरीकडे 2025 मध्ये आतापर्यंत यात 30% घट झाली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये हा शेअर 18% घसरला, तर जानेवारीतही याने 15% तोटा दाखवला.

2024 च्या जुलै महिन्यात निबेने आपला 52 आठवड्यांचा उच्चांक ₹2,245.40 ला गाठला होता. मात्र सध्या तो या उच्च पातळीपेक्षा 43% खाली आला आहे. याच कालावधीत निबेने ₹1,171 चा 52 आठवड्यांचा नीचांक गाठला होता, त्यापासून तो आता 9% वर परतला आहे.

कंपनीचा तिमाही निकाल कसा राहिलाय

कंपनीने नुकताच तिमाही निकाल जाहीर केला आहे. डिसेंबर 2024 तिमाहीत निबे कंपनीने उत्पन्नात मोठी वाढ नोंदवली असली, तरीही नफा मोठ्या प्रमाणात घटला आहे. कंपनीचा निव्वळ नफा 56.23% घटून ₹1.93 कोटींवर आला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत ₹4.41 कोटी होता.

महसूल 137.16% वाढून ₹148.68 कोटी वर पोहोचला आहे, जो मागच्या वर्षीच्या याच तिमाहीत ₹62.69 कोटी होता. एकूण खर्चात 151.74% वाढ झाली असून, तो ₹148.38 कोटींवर गेला आहे. कच्चा माल खर्च 39.25% कमी झाला असला, तरी कर्मचारी वेतन खर्च 46.33% वाढला आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

निबेसारखे मल्टीबॅगर पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांसाठी मोठ्या संधी निर्माण करतात, पण त्याचबरोबर मोठ्या जोखमीही घेऊन येतात. अशा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी कंपनीच्या आर्थिक स्थितीचा, व्यवस्थापनाचा आणि दीर्घकालीन विकास धोरणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

निबे शेअरने गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला असला तरी 2025 मध्ये सध्या तो घसरणीचा सामना करत आहे. त्यामुळे भविष्यातील गुंतवणुकीसाठी सावध धोरण आणि योग्य संशोधन आवश्यक आहे. मोठ्या परताव्याच्या आशेने गुंतवणूक करण्याआधी बाजारातील जोखीम ओळखणे आणि योग्य नियोजन करणे महत्त्वाचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe