SBI ने लाँच केली नवीन SIP ; किमान 250 रुपयांपासून सुरू करता येणार गुंतवणूक ! 250 रुपयांची SIP केल्यास किती रिटर्न मिळणार ?

केंद्रातील मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी जनधन योजना सुरू केली होती. दरम्यान आता याच धरतीवर सर्वसामान्य नागरिकांसाठी गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 'जन निवेश' योजना सुरू केली आहे.

Published on -

SBI New SIP : तुम्हीही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? अहो मग आजची ही बातमी खास तुमच्यासाठी. खरंतर अलीकडे बँकेच्या एफडी योजना आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याला अधिक पसंती दाखवली जात आहे.

याचे कारण म्हणजे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकदारांना अधिकचा परतावा मिळतोय. म्युच्युअल फंडमधून गुंतवणूकदारांना सरासरी 12 ते 15 टक्के दराने परतावा मिळत आहे. गेल्या वीस वर्षांच्या काळात म्युच्युअल फंडमध्ये पैसा लावणाऱ्या गुंतवणूकदारांना 12 ते 15 टक्के दराने परतावा मिळाला आहे.

काही गुंतवणूकदारांना याहीपेक्षा अधिकचा परतावा मिळाला आहे. दुसरीकडे पीपीएफ योजना तसेच पोस्टाच्या इतर बचत योजनांमधून आणि बँकांच्या एफडी योजनांमधून ग्राहकांना फक्त पाच ते सहा टक्के दराने परतावा मिळाला आहे.

हेच कारण आहे की आता सुरक्षित गुंतवणुकीऐवजी रिस्की गुंतवणूक पण अधिक परतावा मिळणारी गुंतवणूकीकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. अनेकजण म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान जर तुम्हालाही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे आणि ही बातमी एसबीआय कडून समोर आली आहे. एसबीआयने एक नवीन एसआयपी लॉन्च केली आहे.

मित्रांनो, केंद्रातील मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी जनधन योजना सुरू केली होती. दरम्यान आता याच धरतीवर सर्वसामान्य नागरिकांसाठी गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ‘जन निवेश’ योजना सुरू केली आहे.

या जन निवेश योजनेमुळे देशातील जास्तीत जास्त लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतील अशी आशा आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची बचत वाढणार आहे. एसबीआयने जन निवेश एसआयपी सुरू केली आहे. ही योजना सुरू करण्यामागे उद्देश असा आहे की, गुंतवणुकीची सवय प्रत्येक व्यक्तीला लागावी.

म्हणून आता SBI व्यतिरिक्त, इतर म्युच्युअल फंड देखील असाच गुंतवणूक पर्याय सुरू करतील अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. SBIच्या या योजनेत कमी रकमेसह गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. सध्या नागरिकांना किमान 500 रुपयांपासून एसआयपी करता येते. मात्र एसबीआयच्या या नव्या एसआयपी योजनेमुळे नागरिकांना किमान अडीचशे रुपयांपासून एसआयपी मध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

250 रुपयांची एसआयपी बनवणार लखपती !

महत्त्वाचे म्हणजे 250 रुपयांची एसआयपी करूनही तुम्ही लखपती होऊ शकणार आहेत. जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 250 रुपयांची एसआयपी सुरू केली आणि पुढील 20 वर्ष त्याने ही एसआयपी सुरू ठेवली तर त्याला वीस वर्षांनी जर 12% दराने वार्षिक परतावा मिळाला तर 4 लाख 74 हजार 709 रुपये मिळणार आहेत. यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक फक्त 75 हजार रुपयांची राहणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदाराला व्याज स्वरूपात जवळपास चार लाख रुपये रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe