सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसवणे बंधनकारक

Published on -

१८ फेब्रुवारी २०२५ पुणे : राज्यात सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक करण्यात आले आहे.राज्य परिवहन विभागाने एचएसआरपी २०१९च्या पूर्वीच्या वाहनांना नंबरप्लेट बसवण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे.

याबाबतचे आदेश सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहेत.त्यामुळे वाहन चालकांना आता ३० एप्रिलपर्यंत ही नंबरप्लेट बसवता येणार आहे. पुणे शहरात २०१९ च्या पूर्वीच्या २५ लाखापेक्षा जास्त वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे.हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बनवण्यासाठी एका कंपनीला काम देण्यात आले आहे.

ही नंबरप्लेट बसवण्यास सुरुवात झाली आहे.मात्र वाहनचालकांचा म्हणावा असा प्रतिसाद अद्याप मिळत नाही.आतापर्यंत सात ते आठ हजार वाहनांना ही नंबरप्लेट बसवण्यात आली आहे.तसेच तेवढ्याच वाहनांचे नंबरप्लेट बसवण्यासाठी अर्ज आले आहेत.

परिणामी, ३१ मार्च २०२५ पर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांना ही नंबरप्लेट बसवणे शक्य नाही.त्यामुळे परिवहन विभागाने ही नंबरप्लेट बसवण्यासाठी आता ३० एप्रिल २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात तीन झोन तयार करणार

परिवहन विभागामार्फत या तीन झोनअंतर्गत (विभाग) एचएसआरपी बसवण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.प्रत्येक झोनअंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयांची नियुक्ती करण्यात आली आहे.झोन एक अंतर्गत १२, झोन दोन अंतर्गत १८, तर झोन तीन अंतर्गत २७ आरटीओ कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे.

यामुळे राज्यभरात असलेल्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याचे कामकाज आता अधिक वेगाने होणार आहे.तसेच आधीच्या ३१ मार्च या मुदतीत आणखी ३० दिवसांची मुदत वाढवण्यात आली आहे.त्यामुळे आता ३० एप्रिल २०२५ पूर्वी जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवावी लागणार आहे.त्यानंतर मात्र दंड भरावा लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe