त्या ‘धार्मिक’ यात्रेवर येणार संकट ! काय म्हणाले केंद्रीय आयुषमंत्री ?

Published on -

१८ फेब्रुवारी २०२५ बुलढाणा : राज्यात ‘जीबीएस’चा धोका वाढत चालला आहे.या पार्श्वभूमीवर यात्रांवर निर्बंध घालण्याचे संकेत केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत. केंद्र व राज्य शासन ‘जीबीएस’वर मात करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मार्च महिन्यामध्ये बुलढाणा येथे सैलानी बाबांची मोठी यात्रा भरते.

देशाच्या कानाकापेऱ्यातून भाविक येथे येतात.कोरोना काळात यात्रा,महोत्सवांना फटका बसला होता.आता जीबीएसमुळे देखील यात्रेवर गदा येण्याची शक्यता आहे.प्रतापराव जाधव म्हणाले,जीबीएसचा धोका आहेच.सर्वदूर रुग्ण सापडत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तत्परतेने काम करत आहोत.केंद्र शासन तसेच राज्याचे आरोग्य खातेही जीबीएसवर मात करण्यासाठी तयार असून पूर्ण व्यवस्था केली आहे.गर्दीमुळे जीबीएसचा संसर्ग होत असेल,तर संबंधित डॉक्टरांसह अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यात्रांवरील निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल,असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe