FD News : तुम्हालाही आगामी काळात एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची आहे का? अहो मग आजची ही बातमी तुमच्याच कामाची आहे. आज आपण फिक्स डिपॉझिट वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची माहिती पाहणार आहोत. खरंतर अनेक जण तीन वर्षांच्या एफडी मध्ये पैसे गुंतवतात.
दरम्यान जर तुम्हालाही तीन वर्षांसाठी एफडी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला देशातील अशा पाच बँकांची माहिती देणार आहोत ज्या की तीन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत.

या आहेत तीन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँका
Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदा ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर 7.15% दराने परतावा देत आहे आणि सीनियर सिटीजन ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर 7.65% दराने परतावा देत आहे.
HDFC Bank : एचडीएफसी ही भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत येते. ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेचे करोडो कस्टमर असून ही बँक आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिट वर सर्वाधिक व्याज देते.
तीन वर्षांच्या एफडीवर एचडीएफसी बँकेकडून आपल्या सामान्य ग्राहकांना सात टक्के दराने परतावा दिला जात आहे. यासोबतच ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांवरील ग्राहकांना एचडीएफसी कडून तीन वर्षांच्या एफडीवर 7.50% दराने परतावा दिला जात आहे. अर्थातच ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 0.50% अधिकचा परतावा मिळतोय.
ICICI Bank : ही देखील भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत येणारी एक महत्त्वाची प्रायव्हेट बँक आहे. हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेचे सुद्धा करोडो कस्टमर आहेत आणि ही बँक देखील आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याज देत आहे.
एचडीएफसी बँकेचे आणि आयसीआयसीआय बँकेचे तीन वर्षांच्या एफ डी चे व्याजदर समान आहेत. आय सी आय सी बँक सुद्धा सामान्य ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर सात टक्के दराने आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.50% दराने परतावा देत आहे.
Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँक देखील देशातील एक प्रमुख खाजगी बँक असूनही बँक आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिट वर अधिकचा परतावा देत आहे. या बँकेकडून सामान्य ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर सात टक्के दराने आणि जेष्ठ नागरिक ग्राहकांना 7.60% दराने परतावा दिला जात आहे.
Federal Bank : मिळालेल्या माहितीनुसार ही बँक सामान्य ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर 7.10% दराने परतावा देत आहे तसेच सिनिअर सिटीजन ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांवरील ग्राहकांना बँकेकडून 7.60% दराने परतावा दिला जात आहे.