BEL Share Price : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू असून यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. मात्र या घसरणीच्या काळात शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावात देतील असा विश्वास व्यक्त केला जातोय.
यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीचा सुद्धा समावेश होतो. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना आगामी काळात चांगला परतावा देईल असा विश्वास टॉप ब्रोकरेज फर्मकडून व्यक्त करण्यात आला आहे. सध्या हा स्टॉक शेअर बाजारात 243.90 रुपयांवर ट्रेड करतोय.

आज 18 फेब्रुवारी 2025 रोजी हा स्टॉक 1.89 टक्क्यांनी घसरून 243.90 रुपयांवर ट्रेड करत असून आगामी काळात यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता मात्र वर्तवण्यात आली आहे. ब्रोकरेज फर्मने यासाठी नवी टारगेट प्राईस दिली आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती, मागील पाच वर्षात या स्टॉकची कामगिरी कशी राहिली आहे, ब्रोकरेज फर्मकडून या स्टॉक साठी काय सल्ला देण्यात आला आहे याचंसंदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या शेअर्सची सध्याची स्थिती
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा स्टॉक काल 248.50 रुपयांवर बंद झाला होता. मात्र आज या स्टॉक मध्ये 1.89 टक्क्यांची घसरण झाली असून सध्या तो 243.90 रुपयांवर व्यवहार करत आहे.
या स्टॉकचा 52 आठवड्याचा उच्चांक 340.50 रुपये आणि 52 आठवड्याचा निचांक 179.10 इतका नमूद करण्यात आला आहे. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,78,688 Cr. रुपये आहे आणि कंपनीवर 60.8 Cr. रुपये इतकं कर्ज आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने किती परतावा दिलाय?
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच BEL च्या स्टॉकने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 30.29% इतका परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षात या कंपनीचे स्टॉक 280.69 टक्क्यांनी वाढले आहेत आणि गेल्या पाच वर्षात या कंपनीचे स्टॉक 864.63 टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र YTD आधारावर या कंपनीचे स्टॉक 16.83 टक्क्यांनी घसरले आहेत.
ब्रोकरेजचा सल्ला काय?
टॉप ब्रोकरेज Yahoo Financial Analyst ने या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या ब्रोकरेज कडून भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड च्या स्टॉक साठी 380 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.
म्हणजेच सध्याच्या भावपातळीपासून हा स्टॉक 55.80 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे आगामी काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. म्हणून आता हा स्टॉक आगामी काळात कशी कामगिरी करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.