Reliance Industries Share गुंतवणूकदारांना मालामाल बनवणार ! तज्ञांनी दिली बाय रेटिंग, टार्गेट आताच नोट करा

Reliance Industries लिमिटेडच्या स्टॉकने गेल्या पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 86.87% दराने परतावा दिला असून आता आगामी काळात हा स्टॉक आणखी वाढणार असा अंदाज आहे. टॉप ब्रोकरेजकडून या स्टॉक साठी बाय रेटिंग देण्यात आली असून हा स्टॉक पुन्हा एकदा शेअर बाजारात फोकस मध्ये आला आहे. जेफरीजने या स्टॉकला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Published on -

Reliance Industries Share Price : भारतीय शेअर बाजारात काल प्रमाणेच आजही मोठी घसरण दिसून आली. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

मात्र या घसरणीच्या काळातही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतील असा विश्वास टॉप ब्रोकरेज कडून व्यक्त केला जातोय. आज 18 फेब्रुवारी 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर 0.49 टक्क्यांनी घसरून 1218.95 रुपयांवर ट्रेड करतोय.

आज हा स्टॉक 1224.85 झाला होता मात्र यानंतर या स्टॉकच्या किमतीत घसरण झाली. दरम्यान, आज आपण या स्टॉकची गेल्या पाच वर्षांमधील कामगिरी आणि या स्टॉक साठी ब्रोकरेज कडून काय सल्ला देण्यात आला आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

स्टॉक मार्केट मधील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सध्याची परिस्थिती

हा स्टॉक काल 17 फेब्रुवारी 2025 रोजी 1224.90 रुपयांवर क्लोज झाला होता आणि आज हा स्टॉक 1218.95 रुपयांवर ट्रेड करतोय. म्हणजेच यामध्ये आज घसरण झाली आहे.

या स्टॉकचा 52 आठवड्याचा उच्चांक 1608.80 आणि 52 आठवड्याचा निचांक 1193.35 रुपये इतका आहे. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 16,47,566 कोटी रुपये इतके आहे. सध्या या कंपनीवर 3,57,525 Cr. रुपये इतकं कर्ज आहे.

या स्टॉकने किती परतावा दिला ?

या कंपनीचा स्टॉक गेल्या एका वर्षात -16.26% घसरला आहे. पण, गेल्या तीन वर्षात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 10.82% इतका परतावा दिला आहे आणि गेल्या पाच वर्षात या कंपनीचा स्टॉक 86.87% इतका वाढला आहे. तसेच, YTD आधारावर हा स्टॉक 0.29 टक्क्यांनी वधारला आहे.

ब्रोकरेजचा सल्ला काय?

जेफरीज ब्रोकरेज कडून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्टॉकसाठी सकारात्मक आउटलुक देण्यात आले आहे. या ब्रोकरेजने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड स्टॉकसाठी बाय रेटिंग दिली असून यासाठी 1660 रुपयांचे टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आले आहे.

म्हणजेच जेफरीजने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना 36.18 टक्क्यांनी परतावा देऊ शकतो असा अंदाज ब्रोकरेज कडून व्यक्त करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe