Dividend Stock : एकीकडे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे तर दुसरीकडे शेअर बाजारातील काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवत आहेत. खरंतर, शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. तर दुसरीकडे शेअर बाजारातूनच काही गुंतवणूकदार चांगली कमाई करत आहेत.
दरम्यान गेल्या पाच दिवसांच्या काळात शेअर बाजारात घसरण सुरू असतानाही एकाच सिगरेट बनवणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गॉडफ्रे फिलिप्स इंडिया या सिगरेट बनवणाऱ्या कंपनीचे स्टॉक गेल्या पाच दिवसात 50 टक्क्यांनी वाढले आहेत.

आज 18 फेब्रुवारी 2025 रोजी या कंपनीचे स्टॉक तब्बल दहा टक्क्यांनी वाढले आहेत. दरम्यान या कंपनीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपले तिमाही निकाल जाहीर केले असून आज आपण या कंपनीचे तिमाही निकाल कसे राहिलेत याचा आढावा घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत.
गॉडफ्रे फिलिप्स इंडियाच्या स्टॉकची सध्याची स्थिती कशी आहे?
गॉडफ्रे फिलिप्स इंडियाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपले तिमाही निकाल जाहीर केलेत. कंपनीच्या तिमाही निकालात कंपनीला जबरदस्त प्रॉफिट झाल्याचे दिसते. यामुळे तिमाही निकाल समोर आल्यानंतर कंपनीचे स्टॉक रॉकेट गतीने वाढत आहेत.
12 फेब्रुवारी रोजी म्हणजे एक आठवड्यापूर्वी गॉडफ्रे फिलिप्स इंडियाचे शेअर्स 4960 रुपयांवर ट्रेड करत होते. पण आज 18 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीच्या शेअर्सची किंमत 7700 रुपयांच्या पुढे गेली आहे. अर्थातच एका आठवड्यातच कंपनीचे स्टॉक 50 टक्क्यांनी वाढले आहेत.
कंपनीचे तिमाही निकाल कसे राहिलेत?
कंपनीचा नफा गेल्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत 48.7% ने वाढून 316 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीचा महसूल सुद्धा या तिमाहीत वाढला आहे. कंपनीचा महसूल 27.3% टक्क्यांनी वाढला आहे.
या कंपनीचा महसूल चालू तिमाहीत 1591.2 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा EBITDA सुद्धा 57.6 टक्क्यांनी वाढला आहे. ऑपरेटिंग EBITDA 358.8 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
या कंपनीच्या तिमाही निकाल चांगल्या जोरदार राहिले असल्याने सध्या गुंतवणूकदारांमध्ये या कंपनीची जोरदार चर्चा असून या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. दुसरीकडे कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभांश देण्याची सुद्धा घोषणा केली आहे.
कंपनीची कामगिरी कशी राहिली?
गेल्या बारा महिन्यांमध्ये अर्थातच एका वर्षात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 180 टक्क्याहून अधिकचे रिटर्न दिले आहेत तसेच गेल्या तीन वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 600 टक्क्याहून अधिकचे रिटर्न दिले आहेत.
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्याचा उच्चांक 8480 रुपये आणि 52 आठवड्याचा नीचांक 2506.15 रुपये इतका आहे. एकंदरीत गेल्या तीन वर्षांच्या काळात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला भरघोस परतावा दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे कंपनीची अलीकडील कामगिरी देखील शेअरहोल्डर्ससाठी फायद्याची ठरली आहे.