कमी दिवसांत हजारोंचा नफा ! HDFC च्या ‘या’ FD योजनेत 2.5 लाखांची गुंतवणूक केल्यास मिळणार 36 हजार 500 रुपयांचे रिटर्न

HDFC ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. आरबीआयकडून या बँकेला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेच्या यादीत ठेवण्यात आले आहे. यामुळे एचडीएफसी मध्ये एफडी करणाऱ्यांचे प्रमाण फार अधिक आहे. दरम्यान, जर तुम्हीही एचडीएफसी बँकेत एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी बँकेची 21 महिन्यांची एफडी योजना फायद्याची ठरणार आहे. बँकेच्या 21 महिन्यांच्या एफडी योजनेत ग्राहकांना 7.10% पासून ते 7.60% पर्यंतचे व्याज दिले जात आहे. सामान्य ग्राहकांना या एफडी मध्ये 7.10% दराने परतावा मिळतो आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना म्हणजेच ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे अशा ग्राहकांना या एफडी मध्ये 7.60% दराने परतावा मिळतो.

Updated on -

HDFC FD News : खात्रीशीर परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक यासाठी अनेक जण बँकांच्या फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवतात. दरम्यान जर तुमचाही असाच प्लॅन असेल तर तुम्ही अगदीच योग्य ठिकाणी आला आहात. कारण की आज आपण एचडीएफसी या देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.

भारतात आधीपासूनच सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एफडी योजना आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना विशेष प्राधान्य दाखवले जाते. बँकेच्या एफडी योजनेतून ग्राहकांना सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळतो. अलीकडे बँकांनी एफडी वरील व्याजदरात देखील वाढ केली आहे.

एचडीएफसी बँकेबाबत बोलायचं झालं तर ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिट वर चांगले व्याज ऑफर करत आहे. दरम्यान आज आपण एचडीएफसी बँकेच्या 21 महिन्यांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.

कशी आहे एचडीएफसी बँकेची 21 महिन्यांची एफडी योजना

एचडीएफसी बँकेच्या 21 महिन्यांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.10% दराने परतावा मिळतोय. मात्र याच कालावधीच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना म्हणजेच ज्या लोकांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे अशा ग्राहकांना 0.50% अधिकचे व्याजदर लागू आहे.

म्हणजे सिनिअर सिटीजन ग्राहकांनी यामध्ये गुंतवणूक केली तर त्यांना 7.60% दराने परतावा मिळतोय. साहजिकच सामान्य ग्राहकांच्या तुलनेत या एफ डी योजनेतून जेष्ठ नागरिक ग्राहकांना अधिकचा परतावा मिळतोय. त्यामुळे जर तुमच्या घरात कोणी ज्येष्ठ नागरिक असेल आणि त्यांना एफडी करायची असेल तर एचडीएफसी बँकेची 21 महिन्यांची एफडी योजना त्यांच्यासाठी एक परफेक्ट पर्याय ठरणार आहे.

अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार

जर एखाद्या सामान्य ग्राहकाने एचडीएफसी बँकेच्या 21 महिन्यांच्या एफडी योजनेत अडीच लाखांची इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांना 7.10% या सध्याच्या व्याजदरानुसार दोन लाख 83 हजार 750 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच सामान्य ग्राहकांना सध्याच्या व्याजदरानुसार 33 हजार 750 रुपये संबंधित ग्राहकाला व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.

जर, ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 60 वर्षांवरील गुंतवणूकदार असेल तर त्यांना अधिकचा परतावा मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिक ग्राहकांनी या एफडीमध्ये अडीच लाख रुपये गुंतवले तर त्यांना 21 महिन्यांनंतर 7.60% दराने एकूण 2 लाख 86 हजार 500 रुपये मिळतील. अर्थातच 36 हजार पाचशे रुपये ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!