केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुंबई-गोवा महामार्गाची हवाई मार्गे पाहणी ! सुरु होणार ‘हे’ नवीन प्रकल्प

Sushant Kulkarni
Published:

१९ फेब्रुवारी २०२५ देवगड : देवगडचे माजी आमदार स्व. जनार्दन मोरेश्वर ऊर्फ आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप समारंभ आयोजित केला होता त्या समारंभाला मंत्री गडकरी यांनी उपस्थिती लावली.या कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी बोलताना असे सांगितले कि,”मी मुंबई-गोवा महामार्गाची हवाई मार्गे पाहणी केली असून हा महामार्ग पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल”असे आश्वासन केंद्रीय रस्ते,परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

तसेच,जलवाहतूक करणे तोट्याची ठरत असल्यामुळे सी-प्लेन हा उत्तम उपाय असल्याचे त्यांनी सांगितले असून ही वाहतूक कोकण किनारपट्टीवर कोणताही निधी खर्च न करता सुरू करता येईल.यासाठी आपण पुढाकार घ्यावा, मी तुम्हाला योग्य ती मदत करेन,असे आश्वासनही त्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना दिले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले कि,वॉटर कार हा प्रकल्पही अंतिम टप्प्यात असून रस्त्यावरून पाण्यात आणि पाण्यातून पुन्हा रस्त्यावर फिरणारी बस लवकरच कोकण किनारपट्टीवर सुरू करणार,असेही आश्वासन त्यांनी दिले.तसेच आप्पासाहेब गोगटे यांचे स्वप्न असलेला इळये-वरंडवाडी पूल केंद्रीय मार्ग निधीतून उभारण्यासाठी आवश्यक निधी देणार,असेही त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग मधील रेल्वे आणि परिवहन अडचणींकडे वेधले लक्ष !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे आणि परिवहन अडचणींकडे सरकारने लक्ष घालावे कारण प्रवाशांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो ,त्या अडचणी सोडवण्यासाठी ताबडतोब उपाययोजना कराव्या अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सुधीर जोशी यांनी केली आहे.

करूळ व गगनबावडा घाटातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असल्यामुळे कोल्हापूर, गोवा, पुणे, नाशिक, मुंबई यांसारख्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवास्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो.राष्ट्रीय व राज्य महामार्गाला ज्याने जमिनी दिल्या आहेत, त्यांना महामार्गालगत व्यवसाय करण्याची तात्पुरती परवानगी मिळवून द्यावी.महामार्गाचे रुंदीकरण करायचे असेल तर अशावेळी या व्यवसाय करणाऱ्याला कोणती नुकसान भरपाई मिळणार नाही,या अटीवर अशी परवानगी द्यावी,असे जोशी यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe