Tata Motors Share Price : भारतीय शेअर बाजारात आज थोडीशी रिकव्हरी दिसली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये आज सुधारणा झाली असून टाटा समूहाचा टाटा मोटर्स शेअर पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे.
आज 19 फेब्रुवारी 2025 रोजी या स्टॉकच्या किमती थोड्याशा सुधारल्या आहेत आणि यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी आता आउटपरफॉर्म रेटिंग जाहीर करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत, आज आपण टाटा मोटरची सध्याची शेअर बाजारातील स्थिती आणि यासाठी स्टॉक मार्केट विश्लेषकांनी काय टार्गेट प्राईस निश्चित केली आहे याबाबत माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
टाटा मोटरची सध्याची शेअर बाजारातील स्थिती
आज टाटा मोटर्सचे शेअर 0.46 टक्क्यांनी वधारले आहेत. यामुळे पुन्हा एकदा हा स्टॉक फोकस मध्ये आला असून आज हा स्टॉक 685.55 वर ट्रेड करतोय. सध्या या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1,179.00 रुपये आणि 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 667.05 रुपये आहे.
या कंपनीच्या मार्केट कॅपिटल बाबत बोलायचं झालं तर सध्या, टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,52,990 Cr. रुपये आहे. आज बुधवारी दिवसभर टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा स्टॉक 675.05 – 690.95 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. दरम्यान आगामी काळात या स्टॉकच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता स्टॉक मार्केट विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
काय आहे ब्रोकरेजचे मत
आता आपण टाटा मोटरच्या स्टॉकबाबत टॉप ब्रोकरेजचे मत काय आहे याविषयी माहिती पाहूयात. टॉप ब्रोकरेज फर्म CLSA ने टाटा समूहाच्या टाटा मोटर्स या स्टॉक साठी आउटपरफॉर्म रेटिंग जाहीर केली आहे.
सध्या हा स्टॉक 685.55 ट्रेड करतोय मात्र लवकरच याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मकडून या स्टॉक साठी 930 रुपयांचे सुधारित टारगेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे.
ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार हा स्टॉक सध्याच्या भावपातळीपेक्षा 35.66 टक्क्यांनी वधारण्याची शक्यता आहे. यामुळे आता ब्रोकरेजने म्हटल्याप्रमाणे हा स्टॉक 930 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.