पाठीमागून आलेल्या ट्रकने पति पत्नीचा केला अक्षरशः चेंदामेंदा

Updated on -

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : कोपरगाव तालुक्यातील शहापूर शिवारात ट्रक व दुचाकीचा अपघात होऊन संगमनेर तालुक्यातील पती-पत्नी जागीच ठार झाले.बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर ही घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर संगमनेरच्या दिशेने जाणारी (एच.आर. ७४ बी. ६२१८) क्रमांकाच्या मालवाहक ट्रकने (एम.एच. १५ इ.वाय. ८०९८) क्रमांकाच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.या धडकेत दुचाकीवरील सर्जेराव शांताराम सोनवणे (वय ४०) व रुपाली सर्जेराव सोनवणे (वय ३५, रा वेल्हाळे, ता. संगमनेर) हे दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले.

सर्जेराव सोनवणे यांच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेले तर त्यांच्या पत्नी रुपाली सोनवणे यांच्या अंगावरून देखील ट्रक गेली.याबाबत शहापूरचे पोलीस पाटील भागवत खंडीझोड यांनी शिर्डी पोलिसांना अपघाताची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.

ट्रक चालक घटना घडल्यानंतर पळुन चालला होता. मात्र स्थानिकांनी त्यास पकडले.हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे.खराब रस्त्यामुळे सातत्याने अपघात होत असतात.आणखी किती बळी गेल्यानंतर या रस्त्याचे काम संबंधित विभाग करणार आहे,असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News