यात्रेस लागले गालबोट : दोन गटात तुफान राडा अन दगडफेक ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Updated on -

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : सध्या जिल्ह्यातील अनेक भागातील यात्रा महोत्सव सुरू झाले आहेत. मात्र या यात्रेत काही किरकोळ कारणावरून वाद विवाद होत असून त्याचे पर्यावसान हाणामारीत होत आहे.

संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे सुरू असलेल्या यात्रे दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास समनापूर येथील मारुती मंदिरासमोरील मोकळ्या पटांगणात घडली.या हाणामारीत एक जण जखमी झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, पंकज गोरक्षनाथ नेहे हा समनापूर येथे कादर शहाबली संदल पाहण्यासाठी गेला असता, तेथे दोन गटात भांडण झाले.

या भांडणादरम्यान एका जमावाने दगडफेक केल्याने नेहे याच्या डाव्या पायाच्या नळीला दगड लागला.त्यात तो जखमी झाला.या प्रकरणी पंकज नेहे याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी सनी गोविंद कडलग, महेश मच्छद्रिं रोकडे, रोहित रोकडे, नटराज जाधव, चैतन्य संजय बोराडे, रुद्र राजू रोकडे, शिया राजू रोकडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe