Suzlon Energy चा स्टॉक पुन्हा फोकसमध्ये ! स्टॉक 8% नी वाढला, मार्केट एक्सपर्ट काय म्हणतात ?

सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या आणि गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून हा स्टॉक शेअर बाजारात दबावात होता आणि यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आले होते. पण आता पुन्हा एकदा या स्टॉक मध्ये सुधारणा दिसून आली आहे. हा स्टॉक काल 19 फेब्रुवारी 2024 रोजी चक्क आठ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे आगामी काळात हा स्टॉक आणखी वाढणार अशी आशा आता गुंतवणूकदारांना वाटू लागली आहे.

Published on -

Suzlon Energy Share Price : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. या आठवड्याच्या अगदी सुरुवातीपासूनच शेअर बाजार घसरणीच्या मार्गावर आहे. सोमवारपासून भारतीय शेअर बाजार सातत्याने घसरत असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत.

बुधवारी 19 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा एकदा शेअर बाजारात चढ -उतार दिसून आले अन शेवटी बाजार घसरणीसह बंद झाला. मात्र या घसरणीच्या काळातही एका एनर्जी कंपनीचा स्टॉक 19 फेब्रुवारीला तेजस दिसला.

काल सुजलॉन एनर्जी कंपनीचा स्टॉक आठ टक्क्यांनी वाढला असल्याची नोंद करण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले असून आज आपण या कंपनीच्या गेल्या पाच वर्षांची कामगिरी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Suzlon Energy च्या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती

बुधवारी सुझलॉन एनर्जी लिमिटेडचे ​​शेअर्स 55.28 रुपयांच्या पातळीवर आले. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 73.37 हजार कोटी आहे. एनर्जी कंपनी सुझलॉनचे शेअर्स काल एकाच दिवसात आठ टक्क्याहून अधिक वाढलेत.

बीएसईवर हा स्टॉक 50.48 रुपयांवर उघडला आणि 55.28 रुपयांच्या उच्च पातळीवर गेला. यामुळे मात्र शेअर होल्डर्सला मोठा दिलासा मिळाला आहे कारण की गेल्या काही दिवसांपासून हा स्टॉक सातत्याने घसरत होता आणि यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात चिंतेत होते.

मार्केट एक्सपर्ट काय म्हणतात?

सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये बुधवारी 49.85 रुपये निचांकी आणि 55.35 रुपयांची उच्च पातळी नोंदविली गेली, जे की या शेअरमधील उल्लेखनीय चढउतारांचे लक्षण आहे. आनंद राठी ब्रोकरेजचे जिगर पटेल म्हणाले

की, 55.3 रुपयांवर एक निर्णायक क्लोजिंग झाल्यास ही क्लोजिंग 57 रुपयांच्या वाढीसाठी ट्रिगर करू शकते. मार्केट तज्ज्ञांनी सांगितले की, शॉर्ट टर्म साठी हा स्टॉक 50 ते 57 रुपयांच्या दरम्यान ट्रेड करताना दिसू शकतो. आता आपण या स्टॉकची गेल्या पाच वर्षांमधील कामगिरी पाहूयात.

गेल्या पाच वर्षांची कामगिरी कशी आहे

गेल्या एका आठवड्यात, सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये 2.5 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर गेल्या दोन आठवड्यांत या स्टॉकने नकारात्मक परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये 16 टक्के वाढ झाली आहे आणि गेल्या दोन वर्षांत तो 500 टक्क्यांनी वाढला आहे.

गेल्या 5 वर्षात या स्टॉकने 2400 % इतका जबरदस्त परतावा दिला आहे. 30 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत, डीआयआयने सुझलॉन एनर्जीमधील आपली हिस्सेदारी 9.3% पर्यंत वाढवली. शेवटच्या तिमाहीत, घरगुती गुंतवणूकदार संस्थांनी या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe