मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या कंपनीची कमाल, ‘हा’ स्टॉक 3 दिवसांत 17% वाढला, आता 911 रुपयांवरून 1140 रुपयांवर जाणार !

जस्ट डायल कंपनीचे स्टॉक गेल्या सहा महिन्यात 30 टक्क्यांनी घसरलेत मात्र आता हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असा अंदाज आहे. मात्र आता आगामी काळात हा स्टॉक 35 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न देण्याची क्षमता ठेवेल असे म्हटले जात आहे. नुवामा इक्विटीजने या स्टॉक साठी आपली रेटिंग वाढवली आहे. आता ब्रोकरेजने या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली आहे.

Published on -

Just Dial Stock Price : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसले आहेत. नवीन वर्षाचे सुरुवातीचे दोन दिवस शेअर बाजारात मोठी तेजी होती अन यामुळे यंदाचे वर्ष तरी शेअर बाजारासाठी उत्साहवर्धक राहणार असे गुंतवणूकदारांना वाटत होते. मात्र तसे काही घडताना दिसत नाही. सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात मंदीचे सावट असून यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसानही झाले आहे.

मात्र एकीकडे शेअर बाजारात घसरण होत असताना एका कंपनीचे स्टॉक गेल्या तीन दिवसात 17 टक्क्यांनी वाढले आहेत. जस्ट डायल कंपनीचे स्टॉक गेल्या तीन दिवसात 17 टक्क्यांनी वाढले असून सध्या हा स्टॉक 911 च्या रेंजमध्ये ट्रेड करतोय.

अशातच आता टॉप ब्रोकरेज फर्मकडून या कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक अंदाज वर्तवले जात आहेत. दरम्यान आज आपण या स्टॉकचे शेअर बाजारातील सध्याची स्थिती काय आहे, टॉप ब्रोकरेजने या स्टॉकबाबत काय अंदाज वर्तवला आहे? याचा आढावा घेणार आहोत.

जस्ट डायल स्टॉकची सध्याची स्थिती

जस्ट डायल शेअर्स आज गुरुवारी 20 फेब्रुवारी 2025 रोजी 9% नी वाढलेत. सध्या तो 911.90 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहचलाय. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या जस्ट डायलचे शेअर्स BSE वर 8.32% वाढून ₹911.90 वर पोहोचलेत.

जस्ट डायलचे शेअर्स गेल्या तीन सत्रांमध्ये 17% पेक्षा जास्त वाढले आहेत. ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने आता या स्टॉकचे रेटिंग अपग्रेड केले आहे. यानंतर जस्ट डायल शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

ब्रोकरेजचा सल्ला काय?

नुवामा इक्विटीजने सांगितले की, ते जस्ट डायलचे शेअर्स ‘होल्ड’ वरून ‘बाय’ वर अपग्रेड करत आहेत. ब्रोकरेजने जस्ट डायल शेअरसाठी प्रति शेअर 1,140 रुपये टार्गेट ठेवली आहे. म्हणजे बुधवारच्या क्लोजिंग प्राइस पेक्षा ही टार्गेट प्राईस 35 टक्क्यांनी अधिक आहे.

अर्थातच आगामी काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना 35% पर्यंतचे रिटर्न देऊ शकतो. मात्र, गेल्या एका वर्षातील या स्टॉकची कामगिरी फारशी उत्साहवर्धक राहिलेली नाही. गेल्या एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिला आहे.

तसेच गेल्या सहा महिन्यात या कंपनीचे स्टॉक तीस टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र आगामी काळात या कंपनीचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देताना दिसतील असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News