PhonePe IPO लवकरच ! गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी, बाजारात धमाका होणार?

Published on -

भारतात डिजिटल पेमेंटचा क्रांतीकारक बदल घडवणाऱ्या फोन पे (PhonePe) कंपनीने शेअर बाजारात लवकरच IPO (Initial Public Offering) आणण्याची तयारी सुरू केली आहे. डिजिटल पेमेंट आणि यूपीआय ट्रान्झॅक्शनमध्ये आघाडीवर असलेल्या या कंपनीचा IPO गुंतवणूकदारांसाठी एक मोठी संधी ठरू शकतो. सध्या गुगल पे आणि पेटीएमला मागे टाकत फोन पेने भारतात यूपीआय सेगमेंटमध्ये सर्वाधिक मार्केट शेअर मिळवला आहे. त्यामुळे, या IPO ची बाजारात मोठी उत्सुकता आहे.

फोन पे IPO – कंपनीचा मोठा निर्णय 

फोन पेने आपल्या IPO संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, आम्ही शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहोत. 2025 हे कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे, कारण यावर्षी फोन पेचा 10 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे कंपनी आपल्या व्यवसायाचा आणखी विस्तार करण्यासाठी IPO कडे वाटचाल करत आहे. फोन पे भारतातील सर्वात मोठी फिनटेक कंपनी आहे, आणि तिच्या डिजिटल पेमेंट नेटवर्कमध्ये 5.9 कोटीहून अधिक नोंदणीकृत युजर्स आणि 4 कोटी व्यापारी जोडले गेले आहेत.

फोन पेची मार्केटमध्ये आघाडी

भारतीय यूपीआय इकोसिस्टममध्ये फोन पेचे वर्चस्व मोठ्या प्रमाणावर आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत फोन पेने 47.8% बाजारातील हिस्सा मिळवला आहे, तर गुगल पे 37% मार्केट शेअरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ भारतात दर दोन यूपीआय व्यवहारांपैकी एक फोन पेवर होतो. फोन पे अ‍ॅपद्वारे दररोज 31 कोटींपेक्षा जास्त व्यवहार केले जातात, आणि कंपनीचे वार्षिक पेमेंट व्हॉल्यूम (TPV) 145 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. यामुळेच, फोन पेचा IPO मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेणार आहे.

फोन पे IPO मध्ये वॉलमार्टची भूमिका 

फोन पे कंपनीत अमेरिकेतील आघाडीची रिटेल कंपनी वॉलमार्टचा मोठा वाटा आहे. 2024 च्या वार्षिक अहवालात वॉलमार्टने सांगितले होते की, आघाडीच्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी फोन पे मध्ये 18,000 कोटी रुपये गुंतवले आहेत. फोन पेने डिसेंबर 2022 मध्ये सिंगापूरहून भारतात स्थलांतर केले होते, त्यासाठी कंपनीने सरकारला 8,000 कोटी रुपये कर भरला होता. यामुळे भारतात कंपनीची सुस्पष्ट व्यूहरचना आहे आणि आगामी IPO च्या माध्यमातून नवीन गुंतवणूकदारांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe