Bonus Share 2025 : शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्या सध्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत. सोबतच काही कंपन्यांकडून बोनस शेअरची आणि डिविडेंट देण्याची सुद्धा घोषणा होत आहे. त्यामुळे सध्या शेअर बाजारात काही कंपन्यांचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. अशातच शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
विशेषता जे लोक बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही बातमी अधिक खास ठरणार आहे आणि अशा लोकांसाठी ही एक गुंतवणुकीची मोठी संधी राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद राठी वेल्थ लिमिटेड कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा करण्यात आली आहे.

या कंपनीने आज 21 फेब्रुवारी 2025 रोजी यासाठीची रेकॉर्ड डेट सुद्धा ठरवली आहे. यामुळे सध्या या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये असून आज आपण या बोनस शेअर्सबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कंपनी किती बोनस शेअर्स देणार?
आनंद राठी वेल्थ लिमिटेड कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांसाठी 1:1 गुणोत्तरात बोनस शेअर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थातच गुंतवणूकदारांना एका शेअरवर एक फ्री बोनस शेअर मिळणार आहे.
या बोनस इश्यूसाठी कंपनीने 5 मार्च 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. अर्थातच या तारखेपर्यंत कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये ज्या शेअर होल्डर्सचे नाव राहणार आहे त्यांनाचं याचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, कंपनी पहिल्यांदाच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देणार आहे. यामुळे कंपनीच्या या घोषणेची सध्या चर्चा असून या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा देखील दिसून येत आहे.
शेअर्समध्ये झाली सुधारणा
कंपनीच्या बोनस शेअर्सच्या घोषणेनंतर या कंपनीचा स्टॉक फोकस मध्ये आला असून आज या कंपनीच्या स्टॉक मध्ये जवळपास पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. हा स्टॉक सध्या 4061 वर ट्रेड करतोय. काल 20 फेब्रुवारी 2025 रोजी या स्टॉकची क्लोजिंग प्राईस म्हणजेच प्रिव्हियस क्लोजिंग प्राईस 3860.65 इतकी होती.
तीन वर्षात किती परतावा दिला?
BSE वर उपलब्ध आकडेवारीनुसार, आनंद राठी वेल्थच्या शेअर्सची गेल्या काही वर्षांमधील कामगिरी फारच उत्साहवर्धक राहिली आहे. गेल्या एका वर्षात हा स्टॉक 9% तर गेल्या सहा महिन्यांत तो 7 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच गेल्या एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांनी वाढलेत.
या स्टॉकने गेल्या तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 612 टक्क्यांनी आणि गेल्या दोन वर्षात 411 टक्क्यांनी परतावा दिला आहे. दरम्यान आता कंपनीकडून बोनस शेअरची घोषणा करण्यात आली आहे.