अहिल्यानगरमध्ये महिलांसाठी ‘छावा’ चित्रपट मोफत ! कुठे मिळणार तिकीट ? वाचा संपूर्ण माहिती

Published on -

Chhaava Movie Shows Free Ahilynagar : छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे. पहिल्या पाच दिवसांत तब्बल 165 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले आहे. महाराष्ट्रभर मोठ्या संख्येने प्रेक्षक या चित्रपटासाठी गर्दी करत असताना, आता अहिल्यानगरमध्ये महिलांसाठी हा चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी हा निर्णय घेत महिलांना ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी दिली आहे.

आठवडाभर महिलांसाठी मोफत शो !

आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरच्या ‘सिनेलाईफ मिनीप्लेक्स’मध्ये महिलांसाठी आठवडाभर छावा चित्रपट मोफत दाखवण्याची व्यवस्था केली आहे. यामागील उद्देश म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास महिलांना आणि त्यांच्या मुलांना समजावा तसेच या ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमातून भावी पिढीवर शौर्याचे संस्कार व्हावेत.

सध्या छावा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळे काही ठिकाणी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी खास शो बुक करण्याचा निर्णय घेतला आहे, तर काही ठिकाणी राजकीय नेत्यांकडून मोफत शो दाखवले जात आहेत.

तगडी स्टारकास्ट !

छावा चित्रपटात विकी कौशल, अक्षय खन्ना, रश्मिका मंदान्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी शिवाजी सावंत यांच्या प्रसिद्ध छावा कादंबरीचे रुपांतर करत, छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष, बलिदान आणि शौर्याची कथा प्रभावीपणे सादर केली आहे.

प्रेक्षकांसाठी मोठा खर्च

महाराष्ट्रात मनोरंजन कर लागू नसला तरीही, राज्य आणि केंद्र सरकारकडून जीएसटी आकारला जातो. चित्रपटगृहांमध्ये ₹280 च्या तिकीटावर ₹51.86 GST आकारला जात असल्यामुळे तिकीट ₹340 पर्यंत महाग झाले आहे. काही मल्टिप्लेक्समध्ये हे दर ₹700 ते ₹800 पर्यंतही पोहोचत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी हा चित्रपट पाहणे खर्चिक ठरत आहे.

‘छावा’ची धडाकेबाज कामगिरी

पहिल्या पाच दिवसांत 165 कोटींची कमाई करणाऱ्या छावा चित्रपटाने लवकरच 200 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल शो सुरू आहेत, तर काही ठिकाणी तिकीट विक्रीत काही प्रमाणात घट झाल्याचेही दिसून आले आहे. तरीही, संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe