50 हजारात सूरु होतो ‘हा’ व्यवसाय, महिन्याला 1.50 लाखापर्यंत कमाई होणार !

तुम्ही जर तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करणार असाल तर एलईडी बल्ब बनवण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन ठरू शकतो. हा व्यवसाय फक्त 50 हजारात सुरू होतो आणि यातून महिन्याकाठी सहजतेने दीड लाख रुपयांपर्यंतची कमाई करता येणे शक्य आहे.

Published on -

Business Idea 2025 : तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय करायचा आहे का? अहो मग थांबा आजची ही बातमी पूर्ण वाचा, कारण की ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे. खरंतर अनेकांना व्यवसाय सुरू करायचा आहे मात्र कोणता व्यवसाय सुरू करावा हे काही सुचत नाही.

दरम्यान जर तुमचीही अशीच अडचण असेल तर आज तुमची ही अडचण आम्ही दूर करणार आहोत. कारण की आज आम्ही तुम्हाला कमी भांडवलात सुरू करता येणाऱ्या एका भन्नाट बिजनेस प्लॅनची माहिती देणार आहोत.

आज आपण एलईडी बल्ब बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करायचा याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एलईडी बल्ब बनवण्याचा व्यवसाय फक्त पन्नास हजारात सुरू होतो आणि या व्यवसायातून प्रत्येक महिन्याला दीड लाख रुपयांपर्यंतची कमाई करता येणे शक्य आहे.

कसा सुरू करणार व्यवसाय?

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे भांडवल पेक्षा स्किल आवश्यक राहणार आहे. यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एखाद्या संस्थेमधून प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. एलईडी बल्ब कसा बनवायचा, यासाठी काय काय लागतं या साऱ्या गोष्टी तुम्हाला प्रशिक्षणातून शिकता येणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे मार्केटिंग कसे करायचे याचे सुद्धा धडे तुम्हाला प्रशिक्षणात मिळणार आहेत. म्हणजे व्यवसाय सुरू करण्यापासून तर उत्पादनाच्या विक्री पर्यंत सारं काही तुम्हाला अशा प्रशिक्षणातून शिकायला मिळेल आणि यानंतर मग खऱ्या अर्थाने तुम्ही हा बिजनेस स्टार्ट करायला हवा जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल.

तुम्हाला जर हा बिजनेस सुरु करायचा असेल तर तुम्ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थेमधून एलईडी बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेऊ शकता. आता तर स्वयंरोजगार कार्यक्रमांतर्गत सर्वत्र एलईडी बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यासोबत एलईडी बल्ब बनवणाऱ्या कंपन्या प्रशिक्षणही देतात, म्हणून त्यांच्याशीही तुम्हाला संपर्क साधता येणार आहे.

किती गुंतवणूक करावी लागणार?

एलईडी बल्ब बनवण्याच्या प्रशिक्षणा दरम्यान एलईडीचे बेसिक, पीसीबीचे बेसिक, एलईडी ड्रायव्हर, फिटिंग-टेस्टिंग, साहित्य खरेदी, मार्केटिंग, सरकारी अनुदान योजना आणि इतर अनेक गोष्टींबद्दल सांगितले जाईल. या योजनेसाठी च्या भांडवला बाबत बोलायचं झालं तर, तुम्ही छोट्या स्तरावर व्यवसाय सुरू करणार असाल तर तो फक्त 50 हजारात सुरू करता येईल.

या कामासाठी तुम्हाला कोणतेच दुकान उघडण्याची गरज नाही, हा बिजनेस तुम्ही घरीही सुरू करू शकता. तुम्ही तुमच्या राहत्या घरात एलईडी बल्ब बनवू शकता आणि विक्रेतांना विकून चांगली मोठी कमाई करू शकता.

महिन्याला दीड लाखांची कमाई होणार

जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे एक एलईडी बल्ब बनवण्यासाठी साधारणता 50 रुपयांचा खर्च येतो आणि हा बल्ब बाजारात 100 रुपयांना विकला जातो. म्हणजेच या व्यवसायातून तुम्हाला दुप्पट नफा मिळणार आहे.

जर तुम्ही एका दिवसात 100 बल्ब विकण्यात यशस्वी ठरला तर तुम्हाला 5 हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच तुम्ही महिन्याला दीड लाख रुपये कमवू शकता. वार्षिक आधारावर बघितलं तर तुम्ही या व्यवसायातून जवळपास 18 लाख रुपयांपर्यंतची कमाई करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe