Multibagger Stock : इंडियन स्टॉक मार्केटमध्ये हजारो कंपन्या एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहेत, त्यापैकी बर्याच कंपन्यांनी मल्टीबॅगर रिटर्न दिले आहेत. मात्र, सध्या भारतीय शेअर बाजाराची परिस्थिती फारच बिकट बनली आहे. शेअर बाजार सातत्याने घसरत असून यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.
मात्र, अशा या परिस्थितीत सुद्धा काही कंपन्यांचे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. दरम्यान, आज आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकची माहिती पाहणार आहोत ज्याने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना हजारो टक्के रिटर्न दिले आहेत. हा स्टॉक आहे पॅनोरामा स्टुडिओज इंटरनॅशनलचा आहे.

जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज तुमची ही गुंतवणूक 2.7 लाख रुपयांपर्यंत वाढली असेल. महत्त्वाचे म्हणजे या कंपनीत अभिनेता अजय देवगन यांची सुद्धा गुंतवणूक आहे. अशा परिस्थितीत, आज आपण या स्टॉकची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
पॅनोरामा स्टुडिओज इंटरनॅशनलच्या स्टॉकची सध्याची स्थिती
21 फेब्रुवारी 2025 रोजी पॅनोरामा स्टुडिओज इंटरनॅशनलचा स्टॉक इंट्राडे व्यापारादरम्यान सुमारे 9 टक्के वाढलाय. शुक्रवारी हा स्टॉक बीएसईवर 8.67 टक्क्यांनी वाढून 197.45 रुपयांवर बंद झाला.
तसेच गेल्या आठवड्यात या स्टॉक मध्ये 12.5% ची वाढ झाली आहे. बॉलिवूड स्टार अजय देवगण यात कंपनीत गुंतवणूकदार आहे, ज्याचे मार्केट कॅप 1,400.69 कोटी रुपये इतके आहे.
लॉंग टर्म मध्ये स्टॉकने किती परतावा दिला ?
हा स्टॉक गेल्या वर्षात 34 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच गेल्या दोन वर्षात हा स्टॉक 600 टक्क्यांनी वाढला आहे आणि गेल्या तीन वर्षांमध्ये या स्टॉकच्या किमती 1590 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
अर्थात गेल्या तीन वर्षात या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 1590% रिटर्न दिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे गत पाच वर्षांमध्ये या कंपनीच्या स्टॉकने तब्बल 2500% रिटर्न दिले आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये या कंपनीचे स्टॉक 7.25 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होते.
मात्र आता हा स्टॉक 197 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत असून ज्या गुंतवणूकदारांनी फेब्रुवारी 2020 ला या स्टॉक मध्ये 10 हजार रुपये गुंतवले असतील आणि आत्तापर्यंत ही रक्कम होल्ड करून ठेवली असेल त्यांची ही गुंतवणूक आता 2.7 लाख रुपये एवढी झाली असेल.