सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढणार, पण पगारात किती वाढ होणार ? GR कधी निघणार ?

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे. यावेळी देखील महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार आहे. गेल्यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनीच वाढला होता आणि यावेळी सुद्धा महागाई भत्ता तीन टक्क्यांनीच वाढणार असून याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात होणार आहे.

Published on -

DA Hike : पुढील महिन्यात होळीचा मोठा सण साजरा होणार आहे, दरम्यान होळीचा सण साजरा होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता होळीच्या आधीच वाढवला जाणार असल्याचे वृत्त हाती येत आहे.

मार्च महिन्यात होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत अजून सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही पण मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा होतोय.

दुसरीकडे यावेळी महागाई भत्ता कितीने वाढणार याबाबतची आकडेवारी आता समोर आली आहे. अशा स्थितीत आज आपण केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता यावेळी किती वाढणार, तसेच महागाई भत्ता वाढीनंतर पगारात किती वाढ होणार? याच मुद्द्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महागाई भत्ता कितीने वाढणार

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. पहिल्यांदा मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो अन तो जानेवारी महिन्यापासून लागू होतो आणि दुसऱ्यांदा ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्ता वाढतो जो की जुलै महिन्यापासून लागू केला जात असतो.

सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. मागील महागाई भत्ता वाढ ऑक्टोबर महिन्यात झाली होती. त्यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता आणि ही वाढ जुलै 2024 लागू करण्यात आली होती.

आता मार्च 2025 मध्ये महागाई भत्ता वाढणार असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू होणार आहेत. महत्वाचे म्हणजे यावेळी सुद्धा महागाई भत्ता तीन टक्क्यांनीच वाढणार हे एआयसीपीआयच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जुलै ते डिसेंबर 2024 मधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता 56% होणार आहे.

अर्थातच यावेळी सुद्धा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार आहे. तसेच याचा अधिकृत निर्णय मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. म्हणजे मार्च महिन्यात या निर्णयाचा जीआर निघेल. मार्च महिन्याच्या पगारांसोबत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळेल.

पगार किती वाढणार?

किमान 18 हजार रुपये मूळ पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या 53 टक्के दराने 9540 रुपये महागाई भत्ता मिळत असून 56% दराने हा महागाई भत्ता दहा हजार 80 रुपये इतका होणार आहे. अर्थातच महागाई भत्त्यात दरमहा 540 रुपयांची वाढ होणार आहे. वार्षिक आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 6480 रुपयांनी वाढणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe