आता पोलीस दादांना देखील मिळणार नवीन घरे : नवीन वसाहतीसाठी ११५ कोटी मंजूर

Published on -

अहिल्यानगर : नगर शहरात लालटाकी रोडवरील पोलीस मुख्यालयाच्या जागेत असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शासकीय वसाहतीची दुरावस्था झाली होती. त्यामुळे याठिकाणी नवीन इमारत व पोलीस निवासस्थानाच्या नव्या बांधकामासाठी मंजुरी मिळावी यासाठी आ.संग्राम जगताप यांनी २०२३ साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे केला होता.

तसेच विधानभवनात तारांकित प्रश्नही उपस्थित करत राज्य शासनाकडे सतत पाठपुरावाही केला. आ.जगताप यांच्या या पाठपुराव्यास यश आले असून महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने नुकतीच अहिल्यानगर मधील सर्जेपुरा येथे असलेल्या पोलीस वसाहतीच्या जागेवर नवे ३२० फ्लॅट बांधण्यासाठी ११५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या कामाच्या मंजुरीची वर्क ऑर्डर महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने काढली आहे. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. आता त्यांना लवकरच नवे घरे मिळतील, अशी माहिती आविष्कार ग्रुपचे मनोजकुमार जाधव यांनी दिली. अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा येथे असलेल्या पोलीस मुख्यालय येथील जागेवर सध्या असलेली घरे पाडून तेथे नवे बहुमजली अपार्टमेंट उभारून ५०० स्क्वेअर फुटाचे, ३२० टू बीएकके फ्लॅट बांधण्यात येणार आहेत.

तसेच पाण्याची टाकी, अंतर्गत पथदिवे व ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिससही उभारण्यात येणार आहे. या संपूर्ण कामासाठी सुमारे ११५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असलेल्या नव्या हेड क्वार्टरसाठी आ.संग्राम जगताप गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करत होते. त्यास आता मोठे यश आले असून निधी मंजुरी व वर्क ऑर्डरही निघाली आहे. लवकरच कामास सुरवातही होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe