शेअर बाजारातील घसरणीच्या काळातही चालू आठवड्यात ‘या’ 3 स्टॉकने दिलाय जबरदस्त परतावा !

शेअर बाजारात सातत्याने होणारी घसरण ही मार्केटमधील गुंतवणूकदारांची चिंता वाढवत आहे. यामुळे सध्या मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन बनली आहे. मात्र या घसरणीच्या काळातही शेअर बाजारातील काही स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरत आहेत. गोदरेज इंडस्ट्रीज, डेक्कन सिमेंट आणि श्रीराम न्यूज प्रिंट या कंपन्यांचे स्टॉक देखील या चालू आठवड्यात तेजीत राहिले आहेत.

Published on -

Share Market News : शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरण सुरू आहे. नवीन वर्षाची शेअर बाजाराची सुरुवात फारच दणक्यात झाली होती मात्र नंतर बाजारात सातत्याने घसरण झाली. या चालू आठवड्यात देखील शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत. मात्र या घसरणीच्या काळातही बाजारात अशा काही कंपन्यांचे स्टॉक आहेत जे की आपल्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरले आहेत. या बिकट परिस्थितीतही शेअर मार्केट मधील काही शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.

दरम्यान आज आपण अशाच तीन स्टॉकची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांनी या चालू आठवड्यात एकीकडे बाजार जबरदस्त दबावात असतानाही आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे.

कोणते आहेत ते 3 स्टॉक?

गोदरेज इंडस्ट्रीज : या यादीत पहिल्या क्रमांकावर गोदरेज इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉपचा नंबर लागतो. चालू आठवड्यात Godrej Industries कंपनीच्या स्टॉक मध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना चालू आठवड्यात सर्वाधिक परतावा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पाच दिवसांमध्ये हा स्टॉक 41.34 टक्क्यांनी वाढला आहे. 21 फेब्रुवारी 2025 रोजी या कंपनीचे स्टॉक 1103 रुपयांवर क्लोज झाले, या दिवशी या स्टॉक मध्ये 9.02% ची वाढ झाली.

डेक्कन सिमेंट्स : या यादीत दुसऱ्या क्रमांकावर Deccan Cements चा स्टॉक येतो. या शेअरने गेल्या 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 38% इतका परतावा दिला आहे.

या चालू आठवड्यात हा स्टॉक तेजीत राहिला आणि म्हणूनच यावर गुंतवणूकदारांनी अक्षरशा उड्या घेतल्यात. मागील पाच दिवसात हा स्टॉक 37.90 टक्क्यांनी वाढला असून 21 फेब्रुवारी 2025 रोजी या स्टॉकच्या किमती 11.31 टक्क्यांनी वाढल्यात. या दिवशी हा स्टॉक 856 वर क्लोज झाला.

श्री राम न्यूजप्रिंट : या यादीत तिसऱ्या क्रमांकावर Shree Rama Newsprint चा नंबर लागतो. या स्टॉकने सुद्धा चालू आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला आहे.

या शेअरने मागील पाच दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 34.73% रिटर्न दिले आहेत. 21 फेब्रुवारी 2025 रोजी या कंपनीचे स्टॉक 30.88 रुपयांवर क्लोज झालेत. या दिवशी हा स्टॉक 13.82 टक्क्यांनी वधारला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe