28 फेब्रुवारीला उघडणार ‘या’ कंपनीचा IPO ; गुंतवणूकीसाठी किती दिवस मुदत असणार ? प्राईस बँड किती? वाचा संपूर्ण माहिती

शेअर बाजारातील घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एका नामांकित कंपनीचा आयपीएस फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात उघडणार आहे. 28 फेब्रुवारी 2025 रोजी बालाजी फॉस्फेट्सचा आयपीओ उघडला जाणार आहे.

Published on -

IPO GMP : सप्टेंबर 2024 पासून भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू आहे. तेव्हापासून बाजारात सुरू झालेले घसरण आजही कायम आहे, पण या घसरणीच्या काळात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एका कंपनीचा आयपीओ उघडणार आहे. यामुळे आयपीओ मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

या कंपनीचा आयपीओ 28 फेब्रुवारी 2025 रोजी उघडणार आहे आणि यामध्ये गुंतवणूकदारांना 4 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करता येणार. दरम्यान आता आपण याच आयपीओच्या संदर्भात आवश्यक सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात या कंपनीचा आयपीओ येणार

Balaji Phosphates कंपनीचा IPO 28 फेब्रुवारीला उघडणार आहे आणि यात गुंतवणूकदारांना चार मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करता येईल. प्राईस बँड बाबत बोलायचं झालं तर कंपनीने अजून यासाठी प्राईस बँड निश्चित केलेली नाही.

परंतु, मीडिया रिपोर्ट मध्ये या कंपनीकडून लवकरच प्राईस बँड निश्चित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या एक-दोन दिवसात कंपनीकडून प्राईस बँड निश्चित केला जाईल असे म्हटले जात आहे.

आयपीओबाबत मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, कंपनी IPO द्वारे 71.58 लाख शेअर जारी करणार आहे. ज्यामध्ये फ्रेश ईश्यू आणि ऑफर फॉर सेल या दोन्हींचा समावेश आहे. कंपनी फ्रेश इश्यूद्वारे 59.40 लाख शेअर जारी करणार आहे. त्याच वेळी, ऑफर फॉर सेल अंतर्गत 12.18 लाख शेअर जारी केले जातील.

या आयपीओ मध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स जास्तीत जास्त 30 टक्के हिस्सा आरक्षित राहणार आहे. तसेच किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 40% आणि एनआयआयसाठी किमान 30 टक्के हिस्सा आरक्षित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रे मार्केटमध्ये काय आहे स्थिती?

बालाजी फॉस्फेट्सचा आयपीओ सध्या ग्रे मार्केटमध्ये कोणतीही हालचाल करत नाहीये. आज याचा जीएमपी शून्य राहिला आहे. पण येत्या एक-दोन दिवसात कंपनीकडून प्राइस बँड जाहीर होणार आहे आणि यानंतर मग यात हालचाली दिसतील असे म्हटले जात आहे.

या IPO साठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून अरिहंत कॅपिटल मार्केट्स लिमिटेडची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला रजिस्ट्रार आणि NNM सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडला मार्केट मेकर कंपनी बनवण्यात आले आहे. NSE SME मध्ये कंपनीची सूची प्रस्तावित करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe