२४ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : उन्हाचा चटका वाढताच बाजारात भाजीपाल्याची आवक देखील कमी झाली आहे. त्यामुळे अनेक भाज्यांचे भाव देखील वाढले आहेत. यात उन्हाळ्यात सरबतासाठी मोठ्या प्रमाणात वापर होणाऱ्या लिंबाला मागणी वाढली असून त्याचे दर देखील वाढलेले आहेत.त्याचबरोबर भाज्यांमध्ये पालेभाज्यांसह गवारीला चांगला भाव मिळत आहे.
सध्या बाजारात लिंबूची आवक कमी असून, किरकोळ बाजारपेठेत लिंबूला ३० रुपये पावशेर याप्रमाणे विक्री होत आहे. एक लिंबू घ्यायचा असेल, तर पाच रुपयाला लिंबूची विक्री होत आहे. फेब्रुवारीच्या महिन्यात १२० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. पुढील चार महिन्यांचा उन्हाळा असल्याने लिंबाचे दर वाढत असतात.

त्यात यंदा उत्पादन कमी झाल्याने अधिकचे पैसे खरेदीस मोजावे लागत आहेत. उन्हाळा आला की पाण्यामुळे लिंबाच्या उत्पादनात घट होते. त्यामुळे बाजारपेठत आवक कमी होऊन मागणी वाढते. उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू अनेक शीत पेयांसाठी वापरतात. त्यामुळे मागणी वाढते, परिणामी त्याचा भावही वाढतो. तर दुसरीकडे अनेक भागात पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचीच टंचाई निर्माण होत असल्याने पिकांचा विषयच नाही.
जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याची पातळी कमी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पालेभाज्या पिकविणे कमी केलेले आहे. त्यामुळे बाजारात पालेभाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक बऱ्यापैकी कमी होत आहे.तर दुसरीकडे सध्या मार्केटमध्ये इतर फळांच्या तुलनेत संत्रीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. यंदा संत्री बागांवर रोगाने चांगलेच थैमान घातले होते.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला मात्र त्या तुलनेत भाव कमी मिळत आहे. त्यामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात खर्च वजा करता काहीच शिल्लक राहत नसल्याचे वास्तव आहे.
दादा पाटील शेळके बाजार समितीत मिळालेले दर पुढीलप्रमाणे : टोमॅटो ३०० – १३००, वांगी ५०० – २५००, प्लावर २०० – १५००, कोबी ३०० – ८००, काकडी ५०० – १८००, गवार ६००० – १४०००, घोसाळे १५०० – ४५००, दोडका १००० – ४५००, कारले १५०० – ४०००, कैरी ५००० – ८०००, भेंडी १००० – ४५००, वाल १००० – ३०००, घेवडा २५०० – ५०००, तोंडुळे ३५०० – ५०००, डिंगरी १००० – ३०००, बटाटे ४०० – २४००, लसूण ४००० – १२०००, हिरवी मिरची १००० – ६०००, पकांडा १००० – ३०००, आवळा , शेवगा १००० – ३६००, लिंबू १००० – ६०००, आद्रक १५०० – ३५००, गाजर ७०० – २२००, दुधी भोपळा ५०० – १८००, मका कणसे ७०० – १२००, शिमला मिरची १००० – ३६००, मेथी ६०० – २०००, कोथंबिर १५०० – २४००, पालक १००० – २०००, शेपू भाजी १६०० – २२००, पुदीना १५०० – १५००, बीट १००० – २५००, वाटाणा ६०० – ३०००, डांगर ६०० – १०००, कांदा पात १४०० – १६००.
मोसंबी ५०० – ४०००, संत्रा १००० – ६५००, डाळिंब १५०० – १००००, रामफळ ४०००, अननस २२०० – ६०००, चिक्कू २००० – ४५००, द्राक्षे १००० – ८०००, अंजिर ९०००, सफरचंद १०,००० – १५०००, कलिंगड २०० – २२००, खरबुज १००० – ३०००, ॲपल बोरं १००० – २०००, किवी १७०००