नाशिक : मुंबई-नाशिक – महामार्गावरील जुन्या कसारा – घाट रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी – पुढील ६ दिवस बंद असणार आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी – ६ पर्यंत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार असून, सोमवार ते गुरुवार – दरम्यान तसेच ३ ते ६ मार्च या कालावधीत या घाटातील वाहतूक – बंद असणार आहे.
जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती आणि पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी रस्ता दुरुस्तीचे – काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहने नवीन कसारा घाटमार्गे जातील. सायंकाळनंतर सकाळी आठपर्यंत ही वाहतूक जुन्या कसारा घाटातील – नेहमीच्या मार्गाने होईल. या – कालावधीत घाटातील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. वाहतूक निर्बंधाची अधिसूचना अपर पोलीसमहासंचालक (वाहतूक) कार्यालयाने काढली आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वतीने जुन्या कसारा घाटात दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक-मुंबई दरम्यानच्या वाहतुकीत बदल करून काही निर्बंध घालण्यात आले. त्यानुसार या काळात जुन्या घाटातील दोन्ही मार्गावर मध्यरात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहील. जुन्या कसारा घाटात सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत वाहतूक बंद राहील. या काळात नाशिककडे जाणारी सर्व वाहने नवीन कसारा घाटातून मार्गक्रमण करतील. चिंतामणवाडी पोलीस चौकीसमोरून एकेरी मार्गाने वाहनांना मार्गस्थ होता येईल. सायंकाळी सहानंतर जुना कसारा घाट वाहतुकीसाठी पूर्णतः खुला राहणार आहे
अवजड वाहनांना घाट बंद
२४ ते २७ फेब्रुवारी आणि ३ ते ६ मार्च या कालावधीत मुंबई-नाशिक आणि नाशिक-मुंबई या कसारा घाटातील दोन्ही मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. अवजड वाहनधारकांना या काळात नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरून यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून इच्छितस्थळी जाता येईल. वाहतुकीचे हे निर्बंध राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहे
मदत केंद्र
कसारा घाटातील रस्ते दुरुस्ती आणि त्यामुळे उभारणार वळवण्यात येणारा मार्ग लक्षात घेता मुंबई-नाशिक-शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही अडचण असल्यास मदतीसाठी कसारा पोलीस, महामार्ग पोलीस घोटी केंद्र, महामार्ग पोलीस शहापूर केंद्र, आपत्ती व्यवस्थापन टीमही नवीन कसारा घाटात कार्यरत राहणार आहे, तसेच पोलीस कर्मचारी आणि मदत केंद्र उभारले जाणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले