महिला सन्मान बचत प्रमाणपत्र की बँकेची एफडी योजना, महिलांसाठी कोणता ऑप्शन ठरणार फायद्याचा

Published on -

MSSC Vs Bank FD : अलीकडे भारताचे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र असे असले तरी आजही देशात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष प्राधान्य दाखवले जाते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी सरकारी बचत योजनांना आणि बँकेच्या एफडी योजनांना विशेष पसंती दाखवली जाते.

महत्वाचे बाब म्हणजे सरकारकडूनही वेगवेगळ्या बचत योजना सुरू केल्या जात आहेत. महिलांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी देखील सरकारकडून काही बचत योजना सुरू करण्यात आले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अर्थातच एमएसएससी ही बचत योजना सुरू करण्यात आली आहे.

या बचत योजनेतून महिलांना चांगला लाभ मिळतोय. पण महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना फायद्याची ठरते की बँकेची एफडी योजना हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो. दरम्यान आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.

कशी आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही फक्त महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक सुरक्षित बचत योजना आहे. ही योजना दोन वर्षांची असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांना चांगले व्याज दिले जात आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार महिलांना 7.50% दराने व्याज दिले जाते.

मात्र ही एक निश्चित कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली योजना असून या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची दिनांक 31 मार्च 2025 आहे. अर्थातच महिलांना यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यांना या तारखेच्या आधीच यात गुंतवणूक करावी लागणार आहे.

या योजनेअंतर्गत दिले जाणारे व्याज त्रैमासिक आधारावर चक्रवाढ व्याज म्हणून खात्यात जमा केलं जात आणि मॅच्युरिटीनंतर ते दिलं जात. या योजनेत किमान एक हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. म्हणजेच यामध्ये जास्तीत जास्त दोन लाख रुपयांची रक्कम गुंतवता येते.

देशातील प्रमुख बँकांचे दोन वर्षांच्या एफडी वरील व्याजदर

HDFC Bank : एचडीएफसी देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक. आरबीआय ने या बँकेला सुरक्षित बँकेचा दर्जा दिला आहे. देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत एचडीएफसी चा नंबर लागत असून ही बँक 18 महिने ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर सामान्य
नागरिकांना 7.25 टक्के दराने व्याज देत आहे.

ऍक्सीस बँक : ही प्रायव्हेट बँक पंधरा महिने ते दोन वर्षे कालावधीच्या एफडीवर आपल्या ग्राहकांना सर्वाधिक व्याज देते. या कालावधीच्या एफडीवर ॲक्सिस बँकेकडून सामान्य ग्राहकांना 7.25 टक्के दराने व्याज दिले जात आहे.

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून आरबीआयने या बँकेला देखील सुरक्षित बँकेचा दर्जा दिलेला आहे. ही बँक एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.80% दराने व्याज देत आहे.

कॅनरा बँक : कॅनरा बँकेच्या माध्यमातून आपल्या सामान्य ग्राहकांना एक वर्षांपेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 6.85% दराने व्याज देत असल्याची माहिती समोर आली आहे.

इंडसइंड बँक : ही बँक एक वर्ष सहा महिने ते दोन वर्षे मुदतीच्या एफडीवर आपल्या ग्राहकांना सर्वाधिक व्याज देते. या कालावधीच्या एफडीवर इंडसइंड बँकेकडून 7.75 टक्के दराने व्याज दिले जात आहे. म्हणजेच दोन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणारी बँक म्हणून या बँकेला ओळखले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe