Jio Financial Services Stock : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरण सुरू आहे, मात्र शेअर बाजारातील ही घसरण गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शेअर बाजारातील घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसलाय. खरे तर सध्या शेअर बाजारातील कंपन्यांकडून बोनस शेअर, डिवीडेंट देण्याची घोषणा केली जात आहे.
कंपनी आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत, मात्र असे असतानाही सध्या शेअर बाजारात मोठा दबाव दिसत असून अनेक कंपन्यांचे स्टॉक सध्या संघर्ष करताना दिसतायेत. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस च्या स्टॉक मध्ये देखील आज 24 फेब्रुवारी 2025 रोजी थोडीशी घसरण झाली आहे.

सध्या हा स्टॉक 229.5 रुपयांवर ट्रेड करत असून या स्टॉक मध्ये आज 1.80 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज हा स्टॉक 231 रुपयांवर ओपन झाला होता मात्र नंतर याच्या किमतीत घसरण झाली. आज दिवसभर या शेअरची प्राईस रेंज 228.64 ते 233.50 या दरम्यान राहिली आहे.
मात्र आज या स्टॉक मध्ये घसरण दिसली असली तरी देखील आगामी काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देईल असे टॉप ब्रोकरेजचे म्हणणे आहे. ब्रोकरेजने या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
टार्गेट प्राईस काय?
हा स्टॉक सध्या 229 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. या स्टॉक चा 52 आठवड्याचा उच्चांक 394.7 रुपये आणि 52 आठवड्याचा नीच्चांक 217.01 इतका आहे. मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड या कंपनीच्या मार्केट कॅप बाबत बोलायचं झालं तर या कंपनीचे मार्केट कॅप म्हणजेच बाजार भांडवल सध्या एक लाख 45 हजार 916 कोटी रुपये इतके आहे.
दरम्यान शेअर बाजारातील चढउताराच्या काळात या स्टॉकसाठी सकारात्मक संकेत मिळत आहेत. टॉप ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी बाय रेटिंग देण्यात आली आहे. याहू फायनान्स अनालिस्टने या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली असून 347 रुपयांची टार्गेट प्राईस सुद्धा निश्चित करण्यात आली आहे.
अर्थातच सध्याच्या किमतीपेक्षा ही टार्गेट प्राईस 51.20% अधिक आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना आगामी काळात या स्टॉक मधून जवळपास 50% हून अधिकचे रिटर्न मिळण्याची शक्यता ब्रोकरेजकडून वर्तवण्यात आली आहे.