Stock To Buy : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. सप्टेंबर 2024 पासून शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरु आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. दरम्यान शेअर मार्केट मधील या अस्थिरतेमुळे अनेक गुंतवणूकदार मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक नसल्याचे दिसते.
अनेकांना गुंतवणूक तर करायची आहे मात्र या अस्थिरतेच्या काळात कोणत्या स्टॉक मध्ये पैसा लावावा हे सुचत नाहीये. दरम्यान तज्ञांनी कमी दिवसात शेअर मार्केट मधून जर चांगला पैसा कमवायचा असेल तर कोणत्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करायला हवी याबाबत मोठी माहिती दिली आहे.

टॉप ब्रोकरेज कडून शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी तीन असे स्टॉक सुचवण्यात आले आहेत ज्यातून गुंतवणूकदारांना अल्पकालावधीत चांगला परतावा मिळू शकणार आहे. दरम्यान आता आपण याच तीन स्टॉकची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे तीन स्टॉक अल्पावधीत देणार चांगला परतावा
जेएसडब्लू स्टील : नुवामा वेल्थचे टेक्निकल अॅनालिस्ट आकाश हिंदोचा यांनी जेएसडब्लू स्टील संदर्भात सकारात्मक संकेत दिलेत. या यादीतला पहिला स्टॉक म्हणजेच JSW Steel. टॉप ब्रोकरेज कडून हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
खरंतर सध्या हा स्टॉक 966 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय मात्र या स्टॉक साठी १०६० रुपयांचे टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आले आहे. तसेच यासाठी 954.10 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
Tata Steel : टेक्निकल अॅनालिस्ट कुणाल बोथ्रा यांनी टाटा स्टीलच्या स्टॉक साठी बाय रेटिंग दिली आहे. या स्टॉक साठी 148 रुपयांची टारगेट प्राईस निश्चित करण्यात आली असून 135 रुपयांवर टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या हा स्टॉक 140 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय.
श्रीराम फायनान्स : टेक्निकल अॅनालिस्ट नुरेश मेराणी यांनी श्रीराम फायनान्स बाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. सध्या हा स्टॉक 580 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत असून यासाठी 630 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. तसेच यासाठी 560 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आला आहे.