Bank Of Baroda FD News : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. विशेषतः अशा ग्राहकांसाठी ही बातमी कामाची राहील ज्यांना फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायचा आहे. खरे तर फिक्स डिपॉझिट हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार आहे. या ठिकाणी फार आधीपासूनच गुंतवणूक केली जात आहे. एफडीमध्ये महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक पैसा लावतात.
अलीकडे तर बँकांनी एफडीवर चांगले व्याजदर ऑफर करण्यास सुरुवात केली असल्याने सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असणारी बहुसंख्य जनता एफडीचाच पर्याय स्वीकारताना दिसते. अशा या परिस्थितीत जर तुमचाही एफडी करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी बँक ऑफ बडोदाची एफडी योजना सर्वात फायद्याची ठरणार आहे.

ज्यांना कमी दिवसासाठी एफडी करायची असेल त्यांच्यासाठी बँक ऑफ बडोदाची बारा महिन्यांची एफडी योजना सर्वात बेस्ट पर्याय राहील. खरे तर 7 फेब्रुवारी 2025 रोजी आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केली आहे. आरबीआयने रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला.
तब्बल पाच वर्षांनी पहिल्यांदाच रेपो दरात कपात झाली आहे आणि यामुळे साहजिकच फिक्स डिपॉझिटवर दिल्या जाणाऱ्या व्याजदरात सुद्धा कपात केली जाईल अशी शक्यता जाणकार लोकांनी वर्तवलेली आहे.
अजून कोणत्याच मोठ्या बँकेने एफडी वरील व्याजदरात फार मोठी कपात केलेली दिसत नाही मात्र पुढे जाऊन एफडीच्या व्याजदरात सर्वच बँका कपात करण्याची शक्यता नाकारून चालणार नाही.
म्हणूनच जर तुम्हाला एफडी करायची असेल तर लवकरात लवकर फिक्स डिपॉझिट मध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला यातून चांगला परतावा मिळणार आहे. दरम्यान आता आपण बँक ऑफ बडोदाच्या बारा महिन्यांच्या एफडी योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे बँक ऑफ बडोदाची 12 महिन्यांची एफडी योजना?
बँक ऑफ बडोदा ही भारतातील पब्लिक सेक्टर मधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. एसबीआय ही पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आणि त्यानंतर बँक ऑफ बडोदाचा नंबर लागतो. ही बँक फिक्स डिपॉझिटवर गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना चांगले व्याज ऑफर करते.
मिळालेल्या माहितीनुसार ही बँक फिक्स डिपॉझिट वर 4.25% पासून ते 7.30 टक्के दराने व्याज देते. या बँकेच्या बारा महिन्यांच्या एफडी योजनेबाबत बोलायचं झालं तर या कालावधीच्या एफडीवर बँक ऑफ बडोदा कडून सामान्य ग्राहकांना 6.85% दराने आणि जेष्ठ नागरिक ग्राहकांना 7.35% दराने व्याज दिले जात आहे.
12 महिन्यात दोन लाखाचे किती होणार?
बँक ऑफ बडोदाच्या बारा महिन्यांच्या एफडी योजनेत एखाद्या सामान्य ग्राहकाने दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटीवर म्हणजेच बारा महिन्याचा काळ पूर्ण झाल्यानंतर दोन लाख 14 हजार 56 रुपये मिळणार आहेत म्हणजेच एका वर्षातच दोन लाखाच्या गुंतवणुकीवर सामान्य ग्राहकांना 14 हजार 56 रुपयांचे व्याज मिळणार आहे.
दुसरीकडे याच कालावधीच्या एफडी योजनेत जर ज्येष्ठ नागरिक ग्राहकाने दोन लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटी वर म्हणजेच बारा महिन्यांचा काळ पूर्ण झाला की दोन लाख पंधरा हजार एकशे दहा रुपये मिळणार आहेत अर्थात ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 15 हजार 110 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.