SBI Life Dividend : शेअर बाजारात लिस्ट असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून सध्या आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत, सोबतच काही कंपन्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची आणि डिव्हीडंड म्हणजे लाभांश देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. अशातच, एसबीआय लाइफने आपल्या शेअर होल्डर साठी डिव्हीडंड देण्याची घोषणा केली आहे.
खरंतर, एसबीआय लाइफने आपले तिमाही निकाल नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहेत. दुसरीकडे, आता कंपनीकडून लाभांश सुद्धा दिला जाणार आहे. यामुळे हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे. शेअर बाजारात सुरू असणाऱ्या घसरणीच्या काळातही हा स्टॉक फोकस मध्ये आला असून आता खरेदीचा ट्रेंड परत येऊ लागला आहे.

मात्र शेअर बाजारात सध्या विक्रीचा ट्रेंड कायम आहे अन यामुळे लाभांश देण्याची घोषणा केलेली असतानाही या कंपनीचे स्टॉक सावरू शकले नाहीत. दरम्यान एसबीआय लाइफच्या माध्यमातून लाभांशाची रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, आता आपण या कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना किती लाभांश दिला जाणार? तसेच यासाठीची रेकॉर्ड काय आहे? याचा आढावा घेणार आहोत आणि या कंपनीचे स्टॉक सध्या शेअर बाजारात कशी कामगिरी करत आहेत? याबाबतही थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कंपनी किती लाभांश देणार
एसबीआय लाइफने आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभांश देण्याची घोषणा केली आहे, मात्र किती लाभांश मिळणार याबाबत अजून कंपनीने कोणताच निर्णय घेतलेला नाही. परंतु कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक येत्या चार दिवसात संपन्न होणार आहे.
28 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीची बैठक होईल आणि या बैठकीत किती लाभांश दिला जाणार याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, कंपनीकडून किती लाभांश मिळणार याबाबत अजून घोषणा झालेली नसली तरी देखील यासाठीची रेकॉर्ड 7 मार्च 2025 निश्चित करण्यात आली आहे.
शेअरची सध्याची कामगिरी कशी आहे?
हा स्टॉक आज 24 फेब्रुवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये फोकस मध्ये राहिला. मात्र असे असले तरी आज या स्टॉक मध्ये 0.85 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आणि हा स्टॉक सध्या 1482.30 रुपयांवर ट्रेड करतोय. खरेतर 4 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स एका वर्षाच्या नीचांकावर अर्थातच 1,307 रुपयांवर होता.
महत्वाचे म्हणजे यारून तो फक्त तीन महिन्यांत 48 टक्क्यांनी वाढला आणि 3 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 1,935 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. दरम्यान आता या कंपनीने लाभांश देण्याची घोषणा केली असल्याने आगामी काळात या स्टॉकची कामगिरी कशी राहणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.