Stock To Buy | ‘हा’ स्टॉक 13720 रुपयांवर जाण्याची शक्यता ! आयसीआयसीआय सिक्युरिटीजने दिला स्टॉक खरेदीचा सल्ला

सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीच्या बाबत एक महत्वाचे अपडेट हाती येत आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने या स्टॉकसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. या टॉप ब्रोकरेजने हा स्टॉक 55 टक्क्यांपर्यंत रिटर्न देणार असे म्हटले आहे. पण, सध्या हा स्टॉक 8 हजार 900 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय.

Published on -

Stock To Buy : भारतीय शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरे तर, सध्या शेअर बाजारात फारच दबाव पाहायला मिळतं आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांचे स्टॉक सध्या घसरले आहेत. सोलर इंडस्ट्रीज कंपनीचा स्टॉक देखील आपल्या उच्चांकापेक्षा 35 टक्क्यांनी घसरला आहे.

मात्र, या स्टॉक साठी टॉप ब्रोकरेज कडून सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने या स्टॉकसाठी बाय रेटिंग दिलेली आहे, अर्थात हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

अशा परिस्थितीत, आज आपण या स्टॉकची सध्याची शेअर बाजारातील स्थिती आणि यासाठी ब्रोकरेजकडून काय टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Solar Industries India च्या शेअर्सची सध्याची स्थिती

हा स्टॉक आज 24 फेब्रुवारी 2025 रोजी 8,900 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. म्हणजे सध्या हा स्टॉक त्याच्या उच्चाकापेक्षा 35 टक्क्यांनी खाली आहे. खरेतर गेल्यावर्षी जुलै 2024 मध्ये या शेअरने 13 हजार 300 रुपयांचा लाईफ टाईम उच्चांक गाठला होता. तिथून तो आता 35 टक्क्यांनी घसरला आहे.

दरम्यान 18 फेब्रुवारी 2025 रोजी, या शेअरने 8 हजार 500 रुपयांचा नीचांक गाठला होता. या नीचांकापासून आता हा स्टॉक प्रति शेअर चारशे रुपयांनी वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात हा स्टॉक आणखी चांगली कामगिरी करताना दिसेल असे आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले आहे.

टार्गेट प्राईस काय आहे ?

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे ब्रोकरेजने या स्टॉक साठी 13,720 टारगेट प्राईस निश्चित केले आहे जे सध्याच्या किमतीपेक्षा 55 टक्क्यांनी अधिक आहे. अर्थातच आगामी काळात हा स्टॉक गुंतवणूकदारांना 55 टक्क्यांनी रिटर्न देईल असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe