महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्यापासूनच्या प्रलंबित 3% DA वाढीबाबत मोठे अपडेट! केव्हा निघणार GR?

महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे हा महागाई भत्ता लवकरच 53% होणार आहे. याबाबतचा निर्णय फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्च महिन्यात होईल अशी शक्यता आहे. परंतु ही वाढ जुलै 2024 पासून लागू राहील.

Published on -

DA Hike GR : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरंतर राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांची जुलै 2024 पासूनची महागाई भत्ता वाढ प्रलंबित आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासून 53% महागाई भत्ता दिला जात आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% वरून 53% केला होता.

केंद्राच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 50 टक्क्यांवरून 53% करणे प्रस्तावित आहे. मात्र, अजून पर्यंत सरकारने याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. अजूनही राज्यातील कर्मचाऱ्यांना 50 टक्के दरानेच महागाई भत्ता मिळतोय. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची प्रलंबित महागाई भत्ता वाढीचा निर्णय केव्हा होणार हा प्रश्न उपस्थित होतोय.

कधी वाढणार राज्य कर्मचाऱ्यांचा DA?

महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा तीन टक्के महागाई भत्ता वाढीचा प्रलंबित प्रस्ताव लवकरच मंजूर केला जाणार असे दिसते. खरे तर राज्यात सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. हेच कारण आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासूनची महागाई भत्ता वाढ अजून लागू करण्यात आलेली नाही.

पण लवकरच महागाई भत्ता वाढ लागू होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला राज्य कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढीची भेट मिळू शकते. म्हणजेच राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% एवढा होणार आहे.

विशेष म्हणजे याबाबतचा निर्णय या महिन्यात किंवा पुढील मार्च महिन्यात जरी झाला तरी देखील ही वाढ जुलै महिन्यापासूनच लागू होणार आहे. अर्थातच राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार

दुसरीकडे जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. एआयसीपीआयच्या जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील आकडेवारीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढणार आहे.

म्हणजेच या सरकारी नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता 56 टक्के होणार असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहणार आहे. याचा अधिकृत निर्णय मात्र मार्च महिन्यात होईल अशी शक्यता आहे. होळीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 56% करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला जाईल आणि याचा जीआर निघेल असे म्हटले जात आहे.

असे झाल्यास मार्च महिन्याच्या पगारांसोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांना 56% दराने महागाई भत्ता मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा केंद्राकडून दिली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe