Tata Group Stock Target Price : सध्या भारतीय शेअर बाजारातील कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत सोबतच काही कंपन्यांकडून बोनस शेअर आणि डिव्हीडंट देण्याची घोषणा केली जात आहे. यामुळे सध्या शेअर मार्केटमधील अनेक कंपन्यांचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. अशातच आता देशातील सर्वात मोठी ज्वेलरी आणि घड्याळ कंपनी टायटनचे शेअर्स सध्या चर्चेत आले आहेत.
खरंतर टाटा समूहाचा हा स्टॉक नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही महिन्यांपासून टाटा समूहाचे अनेक स्टॉक शेअर बाजारात संघर्ष करताना दिसत आहेत. मात्र या संघर्षाच्या काळातही टाटा समूहाचा टायटन कंपनीचा स्टॉक फोकस मध्ये आहे.

Tata समूहाच्या या स्टॉक साठी सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत. आगामी काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असल्याचे बोलले जात आहे. खरेतर, टायटनचा शेअर आज 25 फेब्रुवारी 2025 रुपये किंचित वाढीसह 3187.40 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचलाय.
या स्टॉकची प्रिव्हियस क्लोजिंग प्राईस म्हणजेच सोमवारी हा स्टॉक 3172.55 वर बंद झाला आहे. दरम्यान, आता ब्रोकरेज कंपन्या टाटाच्या या शेअरसाठी सकारात्मक संकेत देत आहेत. काही ब्रोकरेज कंपन्यांनी या स्टॉकसाठी बाय रेटिंग दिली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे शेअर मार्केट मधील बिग बुल दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांची सुद्धा या कंपनीत गुंतवणूक आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीचे 95 लाख 40 हजार 475 शेअर्स आहेत.
पण टायटन कंपनीच्या शेअर्सने गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना निराश केले आहे. हा स्टॉक तब्बल बारा महिन्यांपासून संघर्ष करताना दिसतोय. पण, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने टायटन स्टॉकला बाय रेटिंग दिली आहे.
मोतीलाल ओसवाल ने या स्टॉक साठी 4000 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. त्याच वेळी, बीएनपी परिबास इंडियाने टायटनच्या शेअर्सवर आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे आणि त्यासाठी 4,050 रुपये टार्गेट प्राईस ठेवली आहे. ब्रोकरेजने म्हटले आहे की, मार्केट लीडर असूनही उद्योगात त्याचा वाटा केवळ 7-8 टक्के आहे.