Stock To Buy : शेअर बाजारातील घसरणीच्या काळात गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे श्री रामा न्युज प्रिंट कंपनीच्या शेअरबाबत. खरंतर या कंपनीने अलीकडेच आपले तिमाही निकाल जाहीर केले होते. सध्या शेअर बाजारातील अनेक कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत. यानुसार या कंपनीने देखील आपल्या तिमाही निकाल जाहीर केलेत.
यात कंपनीचा निव्वळ तोटा मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे दिसले. मात्र असे असतानाही या स्टॉकसाठी टॉप ब्रोकरेजकडून बाय रेटिंग देण्यात आली आहे. अर्थातच स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान ब्रोकरेंजच्या या रेटिंगनंतर आता या स्टॉकची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

गेल्या सहा दिवसांपासून या शेअरमध्ये तेजी दिसली. सतत सहा दिवस हा स्टॉक तेजीत राहिला. आता आपण या कंपनीचे तिमाही निकाल आणि गेल्या काही महिन्यांमधील या स्टॉकची कामगिरी कशी आहे याबाबत माहिती पाहणार आहोत.
स्टॉकची सध्याची शेअर बाजारातील स्थिती
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या हा स्टॉक 34.57 रुपयांवर ट्रेड करतोय. गेल्या एका आठवड्यात या कंपनीचे स्टॉक 135 टक्क्यांनी वधारलेत. एवढेच नाही तर गेल्या 30 दिवसांच्या काळात म्हणजेच एका महिन्यात श्रीरामा न्यूज प्रिंट कंपनीचे स्टॉक 125 टक्क्यांनी वाढलेत.
मात्र आज या स्टॉकच्या किमती 5% कमी झाल्यात. या स्टॉक मध्ये गेल्या काही दिवसांपासून जी तेजी होती त्याला आता काहीसा ब्रेक लागला आहे. कारण की काही गुंतवणूकदारांनी नफा वसुली करण्यासाठी या कंपनीच्या शेअरची जोरदार विक्री केली असल्याचे दिसते.
तरीही काल 24 फेब्रुवारी 2025 रोजी हा स्टॉक त्याचा 52 आठवड्याचा उच्चांक 36.40 वर पोहोचण्यास यशस्वी ठरला. पण, सध्या हा स्टॉक शेअर बाजारात 34.57 वर ट्रेड करतोय. कंपनीने अलीकडेच आपले तिमाही निकाल जाहीर केले होते आणि या निकालानंतर हा स्टॉक फोकस मध्ये आला आहे.
गेल्या एका महिन्यात या स्टॉकने 125 टक्के इतका परतावा दिला असून 1 जानेवारी 2025 पासून आत्तापर्यंत या स्टॉकच्या किमती 91 टक्क्यांनी वाढल्या आहेत. म्हणजेच एक जानेवारी 2025 ते 24 फेब्रुवारी 2025 दरम्यान या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 91% परतावा दिला आहे.
कसे राहिले तिमाही निकाल
डिसेंबरची तिमाही कंपनीच्या दृष्टीकोनातून चांगली राहिली नाही. या कालावधीत कंपनीचा निव्वळ तोटा 80.65 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा 10.09 कोटी रुपये होता. कंपनीचा महसूल 6.22 टक्क्यांनी घटला अन 12.43 कोटी रुपये राहिलाय.
गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा महसूल 13.25 कोटी रुपये होता. याचा अर्थ कंपनीला महसूलमध्ये सुद्धा मोठा धक्का बसला आहे. मात्र असे असले तरी सध्या या कंपनीचा स्टॉक फोकस मध्ये आहे.