Vodafone Idea Share Target Price : गेल्या अनेक दिवसानंतर आज भारतीय शेअर बाजारात थोडीशी सुधारणा दिसली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये सुधारणा झाली असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान, या शेअर बाजारातील तेजीचा अनेक कंपन्यांच्या स्टॉकला फायदा झाला आहे. वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या स्टॉक मध्ये सुद्धा आज सुधारणा झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज 25 फेब्रुवारी 2025 रोजी या कंपनीचा 1.12 टक्क्यांनी वाढला आहे.

सध्या या कंपनीचा स्टॉक 8.01 रुपयांवर ट्रेड करतोय. महत्त्वाचे म्हणजे टॉप ब्रोकरेज या स्टॉकबाबत सकारात्मक संकेत देत असून शेअर बाजारात सुरू असणाऱ्या प्रचंड विक्रीच्या काळातही हा स्टॉक गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देणार असे म्हटले जात आहे.
कारण की, आता या स्टॉक साठी काही ब्रोकरेज फॉर्म कडून होल्ड रेटिंग मिळाली आहे. म्हणजेच हा स्टॉक विक्री करू नये असे स्टॉक मार्केट मधील विश्लेषकांनी सांगितले आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती आणि या स्टॉक साठी किती टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे? याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीच्या स्टॉकची सध्याची स्थिती ?
आज 25 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात ट्रेडिंग सुरु होताच व्होडाफोन आयडिया लिमिटेड शेअर 7.9 रुपयांवर ओपन झाला. अन त्यानंतर मग या स्टॉक ची किंमत वाढली. सध्या या कंपनीचा स्टॉक 1.12 टक्क्यांनी वधारून 8.01 रुपयांवर ट्रेड करत आहे.
या कंपनीच्या स्टॉकचा 52 आठवड्याचा उच्चांक 19.18 रुपये अन 52 आठवड्याचा नीचांक 6.61 रुपये इतका आहे. कंपनीच्या मार्केट कॅप बाबत बोलायचं झालं तर सध्या स्थितीला व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 57,329 Cr. रुपये इतके आहे.
वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या स्टॉकसाठीचे टार्गेट प्राईस
सध्या हा स्टॉक 8.01 रुपयांवर ट्रेड करतोय मात्र लवकरच या स्टॉकच्या किमतीत सुधारणा होईल असे याहू फायनान्स अनालिस्ट ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे.
या स्टॉक साठी ब्रोकरेज कडून तब्बल 15 रुपयांचे टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आले आहे. हा स्टॉक आगामी काळात 87.27% रिटर्न देणार असल्याचा दावा होतोय. यामुळे ब्रोकरेजने हा स्टॉक होल्ड करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे.