राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी, ‘इतका’ वाढला महागाई भत्ता, जीआर पण निघाला

Published on -

DA Hike : महागाई भत्ता वाढीबाबत आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. जुलै 2024 पासून राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता वाढ लागू करणे प्रस्तावित होते.

मात्र सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय काही निघत नव्हता. खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर 2024 मध्ये 53% दराने महागाई भत्ता लागू झाला. यानंतर नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता लागू होणे अपेक्षित होते.

मात्र मध्यंतरी विधानसभा निवडणुकांच्या गडबडीत हा निर्णय लांबणीवर पडला आणि यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या मनात सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा दिसली. मात्र आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ही संपूर्ण नाराजी दूर झाली आहे.

कारण की आज 25 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीचा अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू झालेली आहे.

मात्र आता राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असून या सरकारी नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता 53% एवढा होणार आहे. आज राज्य शासनाच्या वित्त विभागाने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के करण्याबाबतचा शासन निर्णय 25 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित केला आहे.

याचा शासन निर्णय म्हणजे जीआर आज निघाला असला तरी देखील या निर्णयाची अंमलबजावणी ही जुलै 2024 पासूनच होणार आहे. अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर जानेवारी या सात महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे आणि यामुळे राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही एक दुहेरी भेट ठरणार आहे.

पुढल्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये होळीचा मोठा सण येणार आहे आणि या होळीच्या आधीच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळाली असल्याने सध्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

महत्त्वाची बाब अशी की राज्य शासनाच्या वित्त विभागाने महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम चालू महिन्याच्या पगारांसोबतच म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या पगारांसोबतच राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत.

शासन निर्णयात याबाबत स्पष्ट उल्लेख आहे. अर्थातच, आता फेब्रुवारी महिन्याच्या पगारांसोबत म्हणजे जो पगार मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्षात हातात येईल त्या पगारांसोबत राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe