जगात भारी महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी अहिल्यानगरमध्ये हजर !

Published on -

२६ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : आंबट-गोड, सुगंधी, व्हिटॅमिन-सी चा उत्तम खजिना असलेले हंगामी फळ म्हणजे स्ट्रॉबेरी.हे फळ महाग असते पण या हंगामात याचे उत्पादन वाढले असल्यामुळे याच्या किमती कमी झाल्या असून याची किंमत सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी असून आत्ता हे हंगामी फळ महाबळेश्वर आणि इतर भागांतून नगर जिल्ह्यात विक्रीसाठी दाखल झाले आहे.१२० ते दीडशे रुपये किलो अश्या भावाने सध्या स्ट्रॉबेरी विकली जात आहे.

लाल भडक रंग आणि दिसायला आकर्षक असलेली तसेच चवीला आंबट-गोड असणारी स्ट्रॉबेरी खायला सगळ्यांनाच आवडते.डिसेंबरच्या शेवटाला आणि जानेवारी महिण्याच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरीची मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते.स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर पोषक तत्त्व असतात त्यामुळे स्ट्रॉबेरी खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते.म्हणूनच सध्या नागरिक स्ट्रॉबेरी खरेदी करू लागले आहे.शिवाय भावही आवाक्यात असल्यामुळे स्ट्रॉबेरीची मागणी वाढत आहे.

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी जगात भारी

शेतकरी वर्गाला आर्थिक स्थिरता देणाऱ्या स्ट्रॉबेरीची ठिकठिकाणी लागवड केली जात आहे; पण महाबळेश्वरमधली तांबडी माती, त्यातील गुणधर्म, हवा, पाणी स्ट्रॉबेरीसाठी अत्यंत पोषक असते त्यामुळे येथे पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीचा रंग, रूप आणि चव सगळ्यात वेगळी असते.दुसरीकडे कुठेच अशी रंगसंगती, चव व फळे पहायला मिळत नाही. त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला जगभरात मागणी असते.

३० रुपयांत २५० ग्रॅमचा बॉक्स

स्ट्रॉबेरीचा भाव आवाक्यात आले असून नगर शहरात चौकाचौकात स्ट्रॉबेरीचे २५० ग्रॅमचे बॉक्स विक्रीला आलेले असल्याचे दिसत आहेत. ३० ते ५० रुपयांना हे बॉक्स मिळतात.आता हंगाम संपत आला असून, पुढील काही दिवसांत हे भाव वाढण्याची शक्यता आहे.

पोषणतत्त्वांचा खजिना

स्ट्रॉबेरीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. त्यातील व्हिटॅमीन-सी आणि मॅग्नेशियममुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.

स्ट्रॉबेरी वजन आणि साखर कमी करते

स्ट्रॉबेरी खाण्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत.या फळात कॅलरी व साखर खूप कमी असते. मुबलक फायबर असतात. या फळाच्या सेवनाने वजन व शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. वर्षातून चार ते पाच महिनेच या फळाचा हंगाम असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe