शहरात चाललंय काय ? पाच जणांच्या टोळक्याने केला व्यापाऱ्यावर कोयत्याने हल्ला

Published on -

Ahilyanagar News : सध्या जिल्ह्यात चोरी दरोडे यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचसोबत महिलांचे दागिने देखील ओरबडले जात आहेत. या घटना कमी होत्या म्हणून की काय त्यात आता सावेडी परिसरात एका व्यापाऱ्यावर पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केला आहे. सागर पुरुषोत्तम कुकरेजा (वय ३३, रा.प्रोफेसर कॉलनी चौक, नगर) असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी,कुकरेजा व त्यांचा मित्र संतोष रामनाणी हे दोघे दुचाकीवर रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास प्रोफेसर चौक ते गुलमोहर रोड असे जात होते. समर्थ शाळेसमोर अचानक त्यांच्या पाठीमागून एका विनाक्रमांकाच्या दुचाकीवर एक इसम पुढे गेला. पुढे त्याने थांबून या दोघांना अडवले व तुम्हाला गाडी चालविता येते का असे बोलून शिवीगाळ करू लागला.

त्यांच्या अंगावर धावून गेला. तो इसम दारू पिलेला होता व तो कुकरेजा यांना दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. त्यावेळी कुकरेजा यांनी पैसे नाहीत असे म्हणाल्यावर त्याचा राग येवून तो धक्काबुक्की करू लागला.या झटापटीत कुकरेजा यांच्या गळ्यातील सोन्याची चेन अंधारात गहाळ झाली.

त्यानंतर त्या इसमाने कोणाला तरी फोन केल्यावर त्याचे आणखी ४ ते ५ मित्र तेथे आले त्यांनी सर्वांनी कुकरेजा व त्यांचा मित्र संतोष रामनाणी या दोघांना कोयत्याच्या लाकडी मुठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेथे आरडाओरडा ऐकून नागरिक जमा झाले. त्यावेळी मारहाण करणारे सर्व तेथून निघून गेले.

तेथे जमलेल्या नागरिकांकडून मारहाण करणाऱ्यांच्या पैकी दोघांची नावे संकेत महाजन व अविनाश फसले असल्याचे कुकरेजा यांना समजले. याबाबत त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून संकेत महाजन व अविनाश फसले यांच्या सह त्यांच्या अनोळखी ४ ते ५ मित्रांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe