PhonePe IPO GMP : भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. विशेषता नवीन IPO ची प्रतीक्षा असणाऱ्यांसाठी ही बातमी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Walmart च्या मालकीची PhonePe लवकरच आयपीओ आणणार आहे.
यासाठीची आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी कंपनीने सध्या 4 गुंतवणूक बँकांची सल्लागार म्हणून निवड केली आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल, जेपी मॉर्गन, सिटी आणि मॉर्गन स्टॅनली या त्या 4 बँका आहेत.

PhonePe ने अलीकडेच सांगितले होते की, कंपनीने IPO ची तयारी सुरू केली आहे. अन आता यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. यामुळे फोन पे चा आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे.
आता आपण फोनपेचा संपूर्ण प्लान नेमका काय आहे? फोनपे च्या आयपीओबाबत सध्याच्या घडीला काय अपडेट समोर येत आहे? हा IPO कधीपर्यंत येणार ? याबाबत संपूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहे कंपनीचा प्लॅन ?
फोन पे ही एक प्रमुख फिनटेक कंपनी आहे. Fintech कंपनी PhonePe चे मूल्य 2023 मध्ये झालेल्या शेवटच्या फंड रायझिंगमध्ये 12 अब्ज इतके होते. आता ते 15 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
आता ही कंपनी आपला आयपीओ आणणार असून PhonePe मार्चच्या पहिल्या आठवड्यात IPO प्रक्रिया सुरू करेल असा एक अंदाज समोर येत आहे. कंपनीने मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयपीओची प्रक्रिया सुरू करण्याचा मानस बोलून दाखवला असल्याचे समजते.
या IPO ला कोटक महिंद्रा कॅपिटल, जेपी मॉर्गन, सिटी आणि मॉर्गन स्टॅनली यांचा पाठिंबा आहे. महत्त्वाची बाब अशी की, गरज भासल्यास पुढील टप्प्यावर आणखी सल्लागार जोडले जाण्याची शक्यता आहे.
तसेच याच्या IPO ची सूची FY26 मध्ये होणे अपेक्षित आहे. याचा अर्थ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात या कंपनीची लिस्टिंग होऊ शकते, असा सुद्धा दावा केला जात आहे. PhonePe चा हा एक मोठा टेक आयपीओ राहणार असा अंदाज आहे.
त्याची इश्यू साईज एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. पण, याबाबत कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही या फक्त सुरुवातीच्या बातम्या आहेत.
पुढे चालून बाजाराच्या परिस्थितीनुसार ही योजना बदलू सुद्धा शकते. पण सूत्राने असं सांगितलंय की, कंपनी 15 अब्ज डॉलरपर्यंतच्या मूल्यांकनाकडे लक्ष देत आहे. यामुळे या आयपीओकडे साऱ्यांचे लक्ष राहणार आहे.