RBI ची रेपो रेटमध्ये कपात, आता देशातील ‘या’ बँका देतायेत सर्वात कमी व्याजदरात होम लोन

Home Loan हवंय ? नजीकच्या भविष्यात होम लोन साठी अर्ज करणार आहात मग आजची बातमी तुमच्या कामाची आहे. सात फेब्रुवारीला आरबीआय ने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला असून आता रेपो दर 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे आता देशातील प्रमुख बँका होम लोन वरील व्याजदरात कपात करत असून आज आपण देशातील सर्वात कमी व्याजदरात होम लोन देणाऱ्या बँकांची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Home Loan : पाच वर्षानंतर पहिल्यांदाच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला. आरबीआयने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सात फेब्रुवारी 2025 रोजी आरबीआय कडून रेपो रेट मध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

आधी आरबीआय चे रेपो रेट 6.50% इतके होते मात्र यात 25 बेसिस पॉइंट ने कपात झाली असल्याने रेपो रेट 6.25 टक्क्यांपर्यंत खाली आलेत. रेपो रेट मध्ये कपात झाल्यानंतर साहजिकचं होम लोनसहित सर्व प्रकारच्या कर्जांच्या व्याजदरात कपात होणे अपेक्षित होत. झालं देखील तसंच आरबीआयच्या निर्णयानंतर देशातील अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केली आहे.

यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध होत आहे. मात्र असे असले तरी जर तुम्हाला भविष्यात होम लोन घ्यायचे असेल आणि तुम्ही स्वस्तात होम लोन देणाऱ्या बँकांची शोधाशोध करत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आपण देशातील सर्वात कमी व्याजदरात होम लोन देणाऱ्या प्रमुख बँकांची माहिती पाहणार आहोत.

या बँका देतात सर्वात कमीं व्याजदरात Home Loan

स्टेट बँक ऑफ इंडिया : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून या बँकेचे होम लोनचे सुरुवातीचे व्याजदर 8.25% पासून सुरू होतात. वीस वर्षाच्या कालावधीसाठी या बँकेकडून दहा लाखांचे गृह कर्ज मंजूर झाले तर ग्राहकाला आठ हजार 520 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

बँक ऑफ बडोदा : या बँकेचे होम लोन वरील व्याजदर 8.15% पासून सुरु होतात. या व्याजदरात जर एखाद्या ग्राहकाला वीस वर्षांसाठी दहा लाखाचे कर्ज मंजूर झाले तर 8460 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

कॅनरा बँक : बँक ऑफ बडोदा प्रमाणेच या बँकेचे होम लोनवरील व्याजदर देखील 8.15% पासून सुरु होतात. या व्याजदरात जर एखाद्या ग्राहकाला वीस वर्षांसाठी दहा लाखाचे कर्ज मंजूर झाले तर 8460 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

इंडियन बँक : बँक ऑफ बडोदा आणि कॅनडा बँकेप्रमाणेच या बँकेचे होम लोनवरील व्याजदर देखील 8.15% पासून सुरु होतात. या व्याजदरात जर एखाद्या ग्राहकाला वीस वर्षांसाठी दहा लाखाचे कर्ज मंजूर झाले तर 8460 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

पंजाब नॅशनल बँक : इंडियन बँक कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा प्रमाणेच पंजाब नॅशनल बँक देखील आपल्या ग्राहकांना किमान 8.15 टक्के व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देते. परंतु हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर असून ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना याचा लाभ मिळणार आहे. जर समजा या व्याजदरात एखाद्या ग्राहकाला या बँकेकडून वीस वर्षांसाठी दहा लाखाचे कर्ज मंजूर झाले तर त्यांना 8460 रुपयांचा मासिक हप्ता भरायचा आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया : या बँकेचे होम लोन वरील व्याजदर 8.10% पासून सुरू होतात. जर समजा एखाद्या ग्राहकाला बँकेच्या या किमान व्याजदरात दहा लाखाचे कर्ज वीस वर्षांसाठी मंजूर झाले तर सदर ग्राहकाला 8430 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया : सेंट्रल बँक ऑफ इंडिया प्रमाणेच युनियन बँक ऑफ इंडियाचे होम लोन वरील व्याजदर सुद्धा 8.10% पासून सुरू होतात. जर समजा एखाद्या ग्राहकाला बँकेच्या या किमान व्याजदरात 10 लाखाचे कर्ज वीस वर्षांसाठी मंजूर झाले तर सदर ग्राहकाला 8430 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe