सध्या मारुती सुझुकी वॅगन आर ही विक्रीच्या बाबतीत देशातील नंबर वन कार ठरली आहे. जर तुम्ही या महिन्यात ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी मोठ्या सवलतीची सुवर्णसंधी आहे. कंपनी आपल्या विक्री वाढवण्यासाठी वॅगनआरवर डिस्काउंट ऑफर्स देत आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे.
जाणून घ्या ऑफर
मारुती सुझुकीने आपली विक्री वाढवण्यासाठी आधी ४८,१०० रुपयांची सूट दिली होती, परंतु आता ती ६३,१०० रुपयांपर्यंत वाढवली आहे. यामुळे ही कार खरेदी करणे अधिक किफायतशीर ठरणार आहे. ग्राहकांना MY 2024 आणि MY 2025 मॉडेल्सवर ही ऑफर उपलब्ध आहे. सवलतीचा फायदा २८ फेब्रुवारीपर्यंत घेता येईल. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या मारुती सुझुकी डीलरशीपशी संपर्क साधू शकता.

वॅगन आरचे दमदार इंजिन पर्याय
वॅगन आर ही दोन वेगवेगळ्या इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – १.० लीटर आणि १.२ लीटर पेट्रोल इंजिन. याशिवाय, तुम्हाला सीएनजीचा पर्याय देखील मिळतो, जो ३४.०४ किमी/किलो मायलेज देतो. यामुळे इंधन बचतीच्या दृष्टीने ही कार खूप फायदेशीर आहे. शिवाय, ही कार ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे ग्राहक त्यांच्या आवडीनुसार गाडी निवडू शकतात.
वॅगन आरचे फीचर्स
वॅगन आरची एक्स-शोरूम किंमत ₹५.५४ लाख ते ₹७.२५ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. यामध्ये ५ लोक सहज आणि आरामात बसू शकतात. ही कार फॅमिली सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहे कारण त्यात भरपूर केबिन स्पेस आणि मोठ्या बूट स्पेससह सामान ठेवण्याची सुविधा आहे. वॅगन आरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ७-इंचाचा स्मार्टप्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे, ज्यामध्ये ४-स्पीकर साउंड सिस्टम आणि नेव्हिगेशन सपोर्ट आहे.
सेफ्टी फीचर्स
सुरक्षा वैशिष्ट्यांच्या दृष्टीने वॅगन आर उत्कृष्ट आहे. यात दोन एअरबॅग्स, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), हिल होल्ड कंट्रोल आणि मागील पार्किंग सेन्सर सारखी अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे ही कार फक्त आरामदायकच नाही, तर सुरक्षिततेच्याही दृष्टीने उत्तम पर्याय ठरते.
का घ्यावी वॅगन आर ?
जर तुम्ही स्वस्त, मस्त आणि रिलायबल कार शोधत असाल, जी इंधन बचत, आधुनिक फीचर्स आणि उत्तम सेफ्टी देते, तर मारुती सुझुकी वॅगन आर हा परिपूर्ण पर्याय आहे. ही कार लहान कुटुंबे आणि शहरातील रोजच्या प्रवासासाठी आदर्श आहे. त्यावर मिळणाऱ्या ६३,१०० रुपयांपर्यंतच्या सवलतीमुळे ती आणखी आकर्षक ठरत आहे.