२७ फेब्रुवारी २०२५ देवळाली प्रवरा : २६ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील चिचोली फाटा परिसरातील पाटीलवाडी रोडवर एका तरुणाने स्वतःच्या जवळ असलेल्या गावठी कट्ट्यातुन स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून घेतल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.त्या तरुणाची प्रकृती गंभिर असुन त्याला पुण्यातील दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या घटनेबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की, कोपरगाव मधील जवळखे या ठिकाणचा राहणारा मुलगा सोमनाथ वाकचौरे याने काही दिवसापुर्वी प्रेम विवाह केला होता पण या मुलाला फसवले गेले,झाले असे कि मुलीच्या घरच्यांनी तुमचा विवाह थाटामाटात करुण देणार असे त्या मुलाला सांगितले आणि त्या मुलीला नातेवाईक घेवून गेले.

तेव्हापासुन त्याचे त्याच्या प्रियसीशी बोलणे बंद झाले होते म्हणून त्याने काल आज दुपारी दोन वाजता चिचोली फाटा येथे सोमनाथ वाकचौरे याने एका जणावर गावठी पिस्तुल रोखले परंतू मोठा जमाव जमा झाल्यामुळे त्याच्या मनात भिती निर्माण झाली आणि त्याने स्वतः वर गोळी झाडून घेतली.
सदर घटनास्थळी स्थानिक लोकांची खूप गर्दी जमली.त्यांनतर त्या घटनास्थळी राहूरीचे पोलिस दाखल झाले.पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्या तरुणाला लोणी मधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते पण तरुणाच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने व त्याची प्रकृती गंभिर असल्याने त्याला पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.