आनंदाची बातमी ! ‘या’ पेट्रोल पंपावर मिळणार 75 रुपये प्रति लिटर पेट्रोल, सुरु झाली नवीन ऑफर

आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 103.50 रुपये प्रति लिटर इतके नमूद करण्यात आले आहेत, मात्र भारत पेट्रोलियमने सुरु केलेल्या एका विशेष ऑफर अंतर्गत ग्राहकांना फक्त 75 रुपये प्रति लिटर दरात पेट्रोल मिळणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.

Published on -

Bharat Petroleum Offer : गेल्या काही वर्षांपासून देशातील सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाली आहे. सर्वच आवश्यक वस्तूंच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहेत. खाद्यतेल, भाजीपाला, डाळी-साळीपासून ते कपड्यांपर्यंत सर्वांच्याच किमती वाढलेल्या आहेत. दुसरीकडे गॅस सिलेंडरच्या किमती देखील आकाशाला गवसणी घालत आहेत आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून, घराचा खर्च भागवणे सर्वसामान्य जनतेला परवडत नाहीये. मात्र वाढत्या महागाईत आता सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. 100 रुपयांचा पल्ला गाठणारे पेट्रोल आता तुम्हाला फक्त 75 रुपये प्रति लिटर प्रमाणे मिळणार आहे.

आज 27 फेब्रुवारी 2025 रोजी देशाच्या आर्थिक राजधानीत आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीत अर्थातच मुंबईत पेट्रोलचे दर 103.50 प्रति लिटर असे आहेत. मात्र, सरकारी तेल वितरक कंपनी भारत पेट्रोलियमने एक विशेष ऑफर आणली आहे ज्या अंतर्गत तुम्हाला 75 रुपये प्रति लिटर दरात पेट्रोल उपलब्ध होणार आहे. दरम्यान आज आपण याच ऑफर बाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय आहे ऑफर?

भारत पेट्रोलियमने आपल्या स्थापना दिनाचे औचित्य साधून एक विशेष ऑफर आणली आहे. यात भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना फक्त 75 रुपये प्रति लिटर दरात पेट्रोल उपलब्ध होणार आहे. जर तुम्ही टू व्हीलर वापरत असाल तर तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळणार आहे.

मात्र कंपनीकडून सुरू करण्यात आलेली ही ऑफर लिमिटेड कालावधीसाठी आहे. उद्या 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 75 रुपये प्रति लिटर प्रमाणे पेट्रोल मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत पेट्रोलियमच्या स्थापना दिवस निमित्ताने ही ऑफर सुरू करण्यात आली आहे.

येत्या 28 फेब्रुवारीला कंपनीचा स्थापना दिवस आहे अन त्यानिमित्ताने ग्राहकांना स्वस्तात पेट्रोल देण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. सध्या ही ऑफर सुरू आहे अन उद्यापर्यंत ग्राहकांना या ऑफरचा लाभ मिळणार आहे.

कोणाला मिळणार लाभ?

भारत पेट्रोलियम कंपनीकडून सुरू करण्यात आलेल्या या ऑफरचा लाभ फक्त अठरा वर्षांवरील नागरिकांना मिळणार आहे. तसेच याचा लाभ कंपनीचे कर्मचारी, डीलर्स, वितरक आणि त्यांचे कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांना मिळणार नाही. अर्थात ही ऑफर फक्त आणि फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.

शिवाय, ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अशा ऑफर्सवर कायदेशीर बंदी आहे, तिथल्या नागरिकांना देखील या ऑफरचा लाभ मिळणार नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एका मोबाईल नंबरवर फक्त एकदाच याचा लाभ मिळणार आहे.

ऑफरचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागणार?

जर तुम्हाला भारत पेट्रोलियमच्या या ऑफर मध्ये सहभागी व्हायचे असेल आणि 75 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल मिळवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर सह कंपनीच्या पेट्रोल पंपावर नोंदणी करावी लागणार आहे. यामध्ये तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक सुद्धा मिळू शकतो. यासाठी तुम्हाला कंपनीच्या पेट्रोल पंपावरून पेट्रोलसह MAK 4T इंजिन ऑइलचा किमान एक पॅक खरेदी करावा लागणार आहे.

इंजिन ऑइल खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्वरित 75 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल मिळणार आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पेट्रोल पंपावर मोफत इंजिन ऑइल सुद्धा बदलू शकता. म्हणजे इंजिन ऑइल खरेदी केल्यानंतर तुम्हाला इंजिन ऑइल चेंज करण्यासाठी कोणतेच चार्ज द्यावे लागणार नाही.

विशेष बाब अशी की इंजिन ऑइलच्या बॉक्सवर एक QR कोडं दिला जाणार आहे जो की पेट्रोल पंपवरील कर्मचारी स्कॅन करतील आणि यानंतर तुम्हाला 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक सुद्धा मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नक्कीच या ऑफरमुळे सर्वसामान्य नागरिकांना थोड्या काळासाठी का होईना पण दिलासा मिळणार आहे. यामुळे सध्या या ऑफरची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe