२८ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : कोर्टात टाकलेली केलेली केस मागे घ्यावी म्हणून महिलेवर हल्ला करून तिला आणि तिच्या कुटुंबाला शिवीगाळ करून धमकी दिल्याबद्दल सहा जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या पीडित महिलेने सांगितलेल्या घटनेवरून हा गुन्हा नोंदवला असून हि घटना केडगाव उपनगरात शनिवारी (२२ फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली.
जालेश बाबड्या काळे, रूपेश नारायण चव्हाण, आलेश बाबड्या काळे, रोहीत तुकाराम चव्हाण, राहुल छोट्या काळे व नारायण झेड्या चव्हाण (रा. भोसले आखाडा, शास्त्रीनगर, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यां आरोपींची नावे आहेत.फिर्यादी केडगाव उपनगरात त्यांच्या कुटुंबासोबत राहत असून,त्या मजुरी करून उदरनिर्वाह करतात.

शनिवारी रात्री ९:३० च्या आसपास त्यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराच्या पत्र्यांवर मोठमोठा आवाज करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे त्या बाहेर आल्यावर समोर जालेश काळे, रूपेश चव्हाण, आलेश काळे, रोहीत चव्हाण, राहुल काळे व नारायण चव्हाण हे हातात लोखंडी रॉड, दांडे व गज घेऊन उभे होते.
त्यांनी फिर्यादीला धमकावत कोर्टात केलेली केस मागे घे,नाहीतर परिणाम भोगावे लागतील असे म्हणत शिवीगाळ करायला सुरूवात केली.त्यामुळे फिर्यादीने त्यांना याचा जाब विचारल्यावर संशयित आरोपींनी त्यांना लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण केली.
या मारहाणीत त्या जखमी झाल्या असून संशयित आरोपींनी त्यांच्या कपड्यांना हिसका देऊन त्यांचा विनयभंग केला आणि केस मागे घेतली नाही,तर डोळ्यात मिरची टाकून कुर्हाडीने हातपाय तोडू आणि घरातील सर्वांना संपवू अशी धमकी दिली.
महिलेने आरडाओरड केला असता त्यांचे पती व शेजारी मदतीला धावले. त्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.जखमी फिर्यादीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार लगड करीत आहेत.