Bank Holiday List In March मार्च महिना आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो, कारण या महिन्यात वित्तीय वर्षाचा शेवट, शासकीय सण आणि बँक क्लोजिंग दिवस यामुळे बँकिंग व्यवहारांवर परिणाम होतो. प्रत्येक महिन्यात बँकांना काही ठरावीक सुट्ट्या असतात, पण मार्चमध्ये या सुट्ट्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाचे बँकिंग व्यवहार करायचे असतील, तर तुम्ही हे आधीच नियोजन करणे आवश्यक आहे.
मार्चमध्ये किती दिवस बँका बंद राहतील ?
मार्च २०२५ मध्ये एकूण १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये ५ रविवार, २ शनिवार आणि ७ विशेष सणांचे दिवस समाविष्ट आहेत. प्रत्येक राज्यातील सुट्ट्या वेगळ्या असतात, त्यामुळे कोणत्या दिवशी तुमच्या राज्यातील बँका बंद असतील याची माहिती आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरून मिळवता येईल.

मार्च २०२५ मध्ये बँक सुट्ट्यांची यादी
मार्च महिन्यात विविध कारणांमुळे बँका ठरावीक दिवशी बंद राहतील. यामध्ये साप्ताहिक सुट्ट्या, राज्य-विशिष्ट सुट्ट्या आणि मोठे सण यांचा समावेश आहे. २ मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी, सर्व बँका बंद, ७ मार्च (शुक्रवार) – चापचर कुट महोत्सव (ऐझॉल, मिझोरम), ८ मार्च (शनिवार) – चापचर कुट महोत्सव (ऐझॉल, मिझोरम), ९ मार्च (शनिवार) – दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी), १३ मार्च (गुरुवार) – होलिका दहन (देहराडून, कानपूर, लखनऊ, रांची, तिरुअनंतपुरम), १४ मार्च (शुक्रवार) – होळी (बहुतांश राज्यांमध्ये बँका बंद), १५ मार्च (शनिवार) – याओसेंग (अगरतळा, भुवनेश्वर, इंफाळ, पटना), १६ मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी, २२ मार्च (शनिवार) – चौथा शनिवार (साप्ताहिक सुट्टी) आणि बिहार दिवस (बिहारमध्ये विशेष सुट्टी), २३ मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी, २७ मार्च (गुरुवार) – शब-ए-कद्र (जम्मू, श्रीनगर), २८ मार्च (शुक्रवार) – जमात उल विदा (जम्मू, श्रीनगर), ३० मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी, ३१ मार्च (सोमवार) – बँक क्लोजिंग डे (मिझोरम आणि हिमाचल प्रदेश वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ईद-उल-फितरच्या दिवशी बँका बंद)
३१ मार्चला बँका सुरू राहणार का ?
३१ मार्च हा बँक क्लोजिंग डे असल्यामुळे बँका ग्राहकांसाठी सुरू राहतील. मात्र, मिझोरम आणि हिमाचल प्रदेश वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ईद-उल-फितरच्या दिवशी बँका बंद असतील. त्यामुळे बँकिंग व्यवहार वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
१ मार्चला बँक चालू की बंद ?
आता महत्वाचा मुद्दा म्हणजे १ मार्चला बँक चालू असेल कि बंद तर याच उत्तर आहे नाही, १ मार्चला बँक चालू असणार आहेत आणि देशातील बँकांना १ मार्चला कोणतीही सुट्टी नाहीय.
बँकिंग व्यवहारांसाठी काय करावे ?
मार्चमध्ये बँक सुट्ट्यांची संख्या जास्त असल्यामुळे आर्थिक व्यवहार नियोजनपूर्वक करणे आवश्यक आहे. काही महत्त्वाचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत:
सुट्ट्यांची यादी तपासा – तुमच्या राज्यात कोणत्या दिवशी बँक बंद राहणार आहे, हे जाणून घ्या.
ऑनलाइन बँकिंगचा उपयोग करा – नेट बँकिंग, UPI आणि मोबाइल बँकिंगसारख्या सेवा वापरून व्यवहार करा.
रोख रक्कम आधीच काढा – सुट्ट्यांमुळे ATM मध्ये रोकड संपण्याची शक्यता असल्याने आवश्यक रक्कम आधीच काढून ठेवा.